
Minister Jayakumar Gore
सोलापूर : महापुरात बाधित झालेल्यांना महिन्याभरात साधी सुई सुद्धा विकत घ्यायला लागू नये, या कुटुंबांना महिन्याचे धान्य, कपडे, कुटुंबातील महिलेला साडी, पुरुषाला कपडे आणि दिवाळीसाठी लागणारे साहित्य देण्याचेही नियोजन आम्ही केले आहे. महापुरामुळे बाधित झालेल्या ४० गावांसाठी प्रत्येकी एक या प्रमाणे नोडल अधिकारी नियुक्त केला जाणार आहे. या अधिकाऱ्याच्या खाली पाच ते सहा अधिकारी असणार आहेत. किती आणि काय साहित्य आवश्यक आहे? याची माहिती दोन सर्व्हेद्वारे दोन दिवसांत संकलित होईल, अशी माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.