"Minister Jaykumar Gore hits back at Dhairyasheel Mohite-Patil with a sharp political remark."
सोलापूर : माढा तालुक्यातील कुडू गावात पोलिस अधिकाऱ्यांना धमकावतानाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. उपमुख्यमंत्री पवार यांना एका मध्यस्थी नेत्याने बाबा जगताप यांना कॉन्फरन्स कॉल जोडून दिला होता, असा दावा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला आहे. तसेच त्या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केली होती. त्याला उत्तर देताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी, ‘ज्यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे, त्यांनी ‘खुदके गिरेबान में झाकना चाहिये...’. त्यांनी स्वतःकडे बघितलं पाहिजे की आपण नेमके काय करतोय, असा टोला लगावला.