
सोलापूर : राज्यातील हिंदूंनी आम्हाला सत्तेत बसवले आहे. त्यांच्यावर झालेला अन्याय सहन केला जाणार नाही. पीडित हिंदूंना ताकद देण्यासाठीच मी सोलापुरात आलोय, अशी भूमिका मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी चौपाडातील पीडित कुटुंबियांची भेट घेऊन मांडली. काही दिवसांपूर्वि बाबा कादरी मशीद आणि पंजाब तालीम परिसरात दगडफेकीची घटना झाली होती. त्या घटनेतील पीडित कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर मंत्री राणे बोलत होते.