
Flood-hit riverbank villages in Maharashtra; officials tour affected areas while villagers await relief.
Sakal
सोलापूर: मागील आठवड्यापासून जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. तर सीना नदीच्या महापुरामुळे नदीकाठावरील ८० हून गावांमध्ये हाहाकार उडाला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अर्धा डझन मंत्र्यांनी पाहणी दौरे केले, आश्वासने दिली. त्यास आठवडा उलटून गेला. मात्र अद्यापपर्यंत शेतकरी, बाधितांच्या हातात प्रत्यक्षात कोणतीही आर्थिक मदत पडली नाही.