Solapur Crime:'प्रियकरासोबत अल्पवयीन मुलगी २ महिन्यांच्या बाळासह पळाली';पाेलिसांनी 'सीडीआर’वरून शाेधून काढले
Teen Girl Flees with Baby and Boyfriend: स्थानिक पोलिसांनी सुरवातीला त्या दोघांचा शोध घेतला, पण त्यांना ते सापडले नाहीत. काही महिन्यांनी हा गुन्हा ग्रामीण पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग करण्यात आला. १७ वर्षे आठ महिने वय असतानाच मुलगी प्रियकरासोबत पळून गेल्याने तरुणाविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला.
सोलापूर: प्रियकरासोबत पळून गेलेल्या मुलीसह प्रियकरालाही सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने कुरकुंभ (ता. दौंड) येथून ताब्यात घेतले आहे. तरुणाला वेळापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्या दोघांनाही दोन महिन्यांचे बाळ आहे.