

Police investigating the case involving a minor girl who travelled to Dehradun after an Instagram friendship.
Sakal
पांगरी: इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या तरुणाला भेटण्यासाठी डेहराडून (उत्तराखंड) येथे पांगरीची अल्पवयीन मुलगी गेली होती. तिच्या शोधासाठी तत्काळ एक विशेष पथक तयार करून ते उत्तराखंडकडे पाठविले होते. डेहराडून रेल्वे स्थानकावर पथकाने मुलीचा शोध लावून तिला सुरक्षित ताब्यात घेतले. पुढील प्रक्रिया पूर्ण करून तिला पांगरी पोलिसांनी तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.