इतर मागासवर्गीय व भटक्या, विमुक्त जातीसाठीचे पंढरपुरात वसतीगृह करण्याचा आ.आवताडेचा प्रश्न

आ. समाधान आवताडे यांनी विधानसभेत उपस्थित केला.
Samadhan Awtade
Samadhan AwtadeCanva

मंगळवेढा: राज्यातील इतर मागासवर्गीय व भटक्या विमुक्त जाती साठी जिल्ह्यातील मंजूर असलेले वसतीगृह पंढरपूर येथे करण्याचा प्रश्न आ समाधान आवताडे यांनी विधानसभेत उपस्थित केला.भाजप सरकार असताना इतर मागासवर्गीय विमुक्त जाती यांच्या शिक्षणाची व राहण्याची हेळसांड होऊ नये म्हणून 15 जानेवारी 2019 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत बाबू जगजीवनराम छात्र आवास योजनेतून 36 वसतीगृह तयार करण्याचा निर्णय घेतला. 22 ऑगस्ट 2019 नागपूर, अहमदनगर, यवतमाळ,वाशिम या चार ठिकाणी जागा उपलब्ध झाली.

परंतु राज्यात झालेल्या सत्ता बदलानंतर त्यांनी 36 ऐवजी 72 वसतीगृह तयार करण्याचा निर्णय घेतला परंतु या वसतीगृहाचे काम प्रत्यक्षात अस्तित्वात आले नसल्यामुळे आज भाजप आ.समाधान आवताडे यांनी याबाबतचा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला त्यामध्ये त्यांनी सध्या चार जिल्ह्याचे प्रस्ताव तयार असून इतर प्रस्तावाबाबत काय झाले ?. या वसतिगृहांना आवश्यक शासकीय जागा उपलब्ध नसेल तर खाजगी जागा योग्य मोबदला देऊन विकत घेतली आहे का ? सोलापूर जिल्ह्यासाठी मंजूर असलेले वसतीग्रह सोलापुरात जागा नसल्यास पंढरपूरला बांधणार काय ? प्रत्येक जिल्ह्यात दोन वसतीगृह बांधण्या ऐवजी लोकसंख्येचा विचार करून त्या प्रमाणात वस्तीगृह बांधणार काय असा प्रश्न उपस्थित केला.

या प्रश्नाला उत्तर देताना इतर मागास वर्गीय सामाजिक शैक्षणिक मागास विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की याबाबतचा प्रस्ताव बाबू जगजीवनराम छात्रावास योजनेमधून केंद्र सरकारला पाठवला होता परंतु पाठवलेल्या प्रस्तावात त्रुटी दाखविण्यात आल्या होत्या व त्रुटीची पूर्तता करून सादर केलेल्या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. परंतु सध्या राज्य सरकारच्या निधीतून या वसतिगृहाचे काम करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीसमोर ठेवला असल्याचे सांगून दोन वर्ष कोरोनामुळे शाळा व वसतीगृह बंद असल्यामुळे याला वित्त विभागाची मान्यता घेऊन हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com