
सोलापूर: सरकारने संविधान एकप्रकारे लपवलेच आहे. याविरोधात आम्ही ‘तब लढे थे गोरों से अब लढेंगे चोरों से’ असा नारा देत संघर्ष करत आहोत. कायद्यातील पळवाट शोधून केंद्र सरकारने निवडणूक आयोगामध्ये आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. यामुळे निवडणूक आयोगाचे निर्णय देशाच्या नाही तर सरकारच्या हिताचे ठरत आहेत. निवडणूक आयोग हे सरकारच्या हातातील बाहुले बनले आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोलापुरात केला.