Traders observe bandh and protest after attack on Late Abasaheb’s historic bungalow, termed the ‘Justice Temple’, in presence of MLA Babasaheb Deshmukh.
Sakal
सोलापूर
MLA Babasaheb Deshmukh: स्व. आबासाहेबांच्या बंगल्यावर म्हणजेच तालुक्याच्या न्याय मंदिरावर हल्ला: आमदार बाबासाहेब देशमुख; व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद
Attack on Late Abasaheb’s Bungalow: आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले, दिवाळीच्या तोंडावर बंदची हाक देणे उचित नव्हते, परंतु लोकांच्या भावना तीव्र असल्याने हा निर्णय झाला. स्व. आबासाहेबांच्या बंगल्यावर म्हणजेच तालुक्याच्या न्याय मंदिरावर हल्ला झाला आहे.
सांगोला: स्व. आमदार गणपतराव देशमुख यांच्या घरावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी (ता. ११) सांगोला तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील सर्वच व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. यावेळी झालेल्या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेते मंडळी सामील होऊन त्यांनी घटनेचा निषेध नोंदविला.