
सोलापूर: आमदार झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडण्याची संधी मिळाली. त्यावेळी दुहेरी जलवाहिनीसाठी ८९ कोटी मिळाले. तसेच शहराला नियमित पाणीपुरवठा व्हावा, यासाठी पाठपुरावा करत असताना मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी विशेष बैठक बोलावली.