
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती त्रिशताब्दी जयंतीनिमित्त ‘आपली संस्कृती, आपला अभिमान’ ही टॅगलाईन घेऊन आमदार गोपीचंद पडळकर यांनी ‘धनगरी रुद्रनाद’ उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमातून पुणे येथे ५० हजार ढोल वादनाचा व २५ हजार जणांचे गजी नृत्य सादर होणार आहे. सोलापूर जिल्ह्यात या उपक्रमाचे सूक्ष्म नियोजन सुरू असून जिल्ह्यातून १० हजार ढोल व गजी नृत्य करणारे ५०० ते १ हजार जण हा उपक्रमात सहभागी करण्यासाठी नियोजन आखले आहे.