Mangalwedha News : आ. प्रणिती शिंदेच्या आक्रमकतेमुळे सत्ताधाऱ्यांनी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मंजूरी दिली - प्रशांत साळे

2009 पासून पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या तालुक्याच्या दक्षिण भागातील 24 गावांसाठी असलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला 2014 साली पहिल्यांदा प्रशासकीय मान्यता दिली.
prashant sale and praniti shinde
prashant sale and praniti shindesakal

मंगळवेढा - शासन दरबारी दुसऱ्यांदा प्रशासकीय मान्यतेसाठी प्रलंबित असलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी जिल्ह्यातील एकमेव विरोधी आ. प्रणिती शिंदे यांनी लक्ष घालत सुरू केलेल्या आक्रमकतेमुळे सत्ताधाऱ्यांनी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मंजूरी दिल्याची माहिती काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांनी दिली.

2009 पासून पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या तालुक्याच्या दक्षिण भागातील 24 गावांसाठी असलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला 2014 साली पहिल्यांदा प्रशासकीय मान्यता दिली. दोन्ही उपमुख्यमंत्र्यानी योजना मार्गी लावण्याचा शब्दही दिला.जानेवारी माहिन्यात मुख्यमंत्र्यांनी मंजूरी दिली. कॅबिनेटची प्रतिक्षा लागून राहिली.

दुसऱ्या सुधारीत प्रशासकीय मान्यतेसाठी प्रलंबित असताना याकडे सरकार सातत्याने दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे 24 गावच्या सरपंचांनी पाठखळ येथे बैठक घेत लोकसभा निवडणूक बहिष्कार व पाण्यासाठी गावे कर्नाटक जोडण्याचा इशारा दिल्यानंतर या सरपंचांनी काँग्रेस कार्यालयात आ. प्रणिती शिंदे यांची भेट घेतली.

या प्रश्नात लक्ष घालण्याची मागणी केल्यानंतर आ.शिंदे यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर या प्रश्नात उंटावरून शेळ्या हाकण्यापेक्षा स्वतःच्या मतदारसंघात 24 गावातील लोकांशी संपर्क करण्यासाठी गाव भेट दौरा केला.

या दौऱ्यात त्यांनी या भागातील लोकांच्या दाहकतेची प्रत्यक्ष जाणीव झाल्यानंतर हा प्रश्न मी अर्धवट सोडणार नसून मी एखाद्या प्रश्नासाठी पूर्ण वेळ देऊन काम करणार असल्याचा शब्द दिल्यानंतर लोकसभा निवडणुकीत याचा मोठा फटका सत्ताधाय्राना पक्षाला बसण्याची भीती होती ही भीती लक्षात घेऊन त्यांनी तातडीने मंगळवेढा उपसा सिंचन योजना कॅबिनेटची मंजूरी दिली.

त्यामुळे हा प्रश्न एवढ्यावर संपत नाही. एवढ्या मोठ्या निधीसाठी किती काळ प्रतीक्षा करावी लागणार हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे. मात्र आ प्रणिती शिंदे यांनी लक्ष घातल्यामुळे त्यासाठी निधी उपलब्ध होण्यासाठी काँग्रेसच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केला असल्याची माहिती तालुकाध्यक्ष साळे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com