

Sakal
सोलापूर : महाविकास आघाडीसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शनिवारी (ता. १) मुंबईत निवडणूक आयागोच्या विरोधात काढलेल्या ‘सत्याचा मोर्चा’त सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. त्यांच्या या मोर्चाची सत्ताधारी भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी खिल्ली उडवली. ‘ एकीकडे असत्याची पाठराखण करायची आणि दुसरीकडे ''सत्याचा मोर्चा'' असे नाव ठेवायचे, हे बरोबर नसल्याचे सांगत विरोधकांवर टीकास्त्र सोडले.