
-राजकुमार शहा
मोहोळ : मोहोळ तालुक्यात सीना नदीला आलेल्या पुराने व पावसाने बाधित झालेल्या मंडळा शिवाय इतर मंडळातील ही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांच्या नुकसानीचे ही सरसकट पंचनामे करावेत, महसूल प्रशासन त्या मंडळात अतिवृष्टी झाली नाही असे कारण देत पंचनाम्यास टाळाटाळ करीत आहे त्यांना पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी आमदार राजू खरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. त्यांच्या समवेत जिल्हाध्यक्ष उमेश पाटील हे होते. त्यामुळे उपमुख्यमंत्री पवार आता काय निर्णय घेतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.