Sangola News : 'आमदार भरती जाहिराती'ची सोशल मीडियावर धुमाकूळ ; सर्व स्तरातून तीव्र प्रतिक्रिया

राज्यात पवित्र पोर्टल द्वारे होणारी शिक्षक भरती मुहूर्त मिळेना अशी अवस्था झाली
mla recruitment advertisement on social media comments viral sangola marathi news
mla recruitment advertisement on social media comments viral sangola marathi newsesakal

Sangola News : शासन एकीकडे फक्त विविध विभागातील भरती बाबत घोषणा करत आहे. शिक्षक भरती गेल्या अनेक वर्षापासून रखडलेली आहे, असे असताना सध्या सोशल मीडियावर मात्र 'आमदार भरती जाहिरात' सध्या जोरदार गाजत आहे. सध्या सर्वच वर्गातून या जाहिरातीवर प्रतिक्रिया मात्र जोरदार मिळू लागल्या आहेत.

सोशल मीडियाचा वापर कोण, कसा, काय करेल सध्या सांगता येत नाही. राज्यात पवित्र पोर्टल द्वारे होणारी शिक्षक भरती मुहूर्त मिळेना अशी अवस्था झाली आहे. भावी शिक्षक या जाहिरातीकडे वाट पाहत बसलेले दिसून येत आहेत.

परंतु काही कारणास्तव ही भरतीची प्रक्रिया मात्र पुढे सरकत नसल्याचे चित्र दिसत आहे. यावर सोशल मीडियातूनही विविध कमेंट्सही येत आहेत. अशातच सध्या सोशल मीडियावर 'आमदार भरती जाहिरात 2024' या आशयाचा पोस्ट मात्र चांगलीच गाजू लागली आहे.

शासन एकीकडे विविध विभागात भरती करणार असल्याचे घोषणा करत आहेत, मात्र प्रत्यक्षात मात्र भरती होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. अशातच आमदार भरती जाहिरात यावर मात्र वेगवेगळ्या कमेंट्स येऊ लागल्या आहेत.

सध्या राजकारणात कोण, कुठल्या पक्षात कोणाला, कधी, कसा पाठिंबा देईल हे सांगू शकत नाही. पक्षनिष्ठा, वैचारिकता शिल्लक राहिली नसल्याचे जनसामान्य उघडपणे बोलून दाखवत आहेत.

राजकारणाच्या या सध्याच्या येत्या - आघाडीवरून जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. यातच आमदार भरती जाहिरातीवर अशाच तीव्र प्रतिक्रिया जनसामान्यातून पहावयास मिळत आहेत. आमदार भरतीनंतर इतरही अनेक फायदे मिळतील. आमदार व्हा, आपल्या बरोबरीने आपला मुलगा नातू, पणतू यांचे पण भविष्य उज्वल करा.. अशा आशयाची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आमदार भरतीची सोशल मीडियावरील जाहिरात

महाराष्ट्र विधानसभेत आमदार पदाच्या 288 जागा त्वरित भरणे आहेत. सुवर्णसंधी आपली वाट पाहत आहे. फक्त पाच वर्षे जॉब करा, आयुष्यात परत कधीही काम करण्याची गरज लागणार नाही. कोणत्याही अनुभवाची गरज नाही. अशिक्षित असला तरी चालेल. कोणताही गुन्हा केलेला असला तरी चालेल. कामकाज नाही केले तरी चालेल, कार्यालयात उपस्थित राहायला नाही तरी चालेल, पगार दोन लाख रुपयेच्या पुढे लगेच सुरू होईल.

वयाच्या 58 वर्षे सेवा करूनही पेन्शन मिळेना

सध्या जुन्या पेन्शन योजनेसाठी मोठ्या प्रमाणात सर्व स्तरातून आंदोलने केली जात आहेत. परंतु जुने पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना अद्यापही लागू झाले नाही. आमदारांना पाच वर्षे निवडून गेल्यानंतर लगेचच पेन्शन सुविधा सुरू होते.

मात्र आयुष्यभर आपल्या क्षेत्रात काम करूनही पेन्शन मिळत नसल्यामुळे या सोशल मीडियाच्या आमदार जाहिरातीमधून कर्मचारी वर्ग तिखट प्रतिक्रिया देत आहे. पाच वर्षात असे काय काम करतात की लगेच त्यांना पेन्शन आयुष्यभरासाठी सुरू राहते असे सवाल विचारले जात आहेत.

आमदारांना मिळणाऱ्या ठळक सुविधा

- मासिक वेतन दोन लाख 40 हजार रुपये

- महागाई भत्ता तीस हजार 900 रुपये

- निवृत्ती वेतन 50 हजार रुपये

- निधनानंतर पत्नीला 40 हजार रुपये

- राहण्यासाठी मोफत निवासस्थान

- कॅन्टीनमध्ये स्वस्तात जेवण

- फोनसाठी 15 हजार रुपयांचा भत्ता

- कुटुंबासह 34 हवाई प्रवास विनामूल्य

- पीए, ड्रायव्हर, संगणक चालक, टपालसाठी विविध भत्ते

शिपाई होण्यासाठीही शिक्षणाची अट लागते, त्याला परीक्षा द्याव्या लागतात. परंतु आमदार होण्यासाठी कोणत्याही परीक्षेची व शिक्षणाची अट घातली जात नाही. राज्य चालवणाऱ्यांना कायद्याचे ज्ञान असले पाहिजे. यासाठी शिक्षणाची अट ही निश्चितपणे हवी. आमदारांना पेन्शन देण्यास माझा विरोध नाही, परंतु आम्हा शिक्षकांनाही त्यांच्या बरोबरीने त्यांच्यापेक्षा जास्त काम करत असल्याने आम्हाला पेन्शनही हवीच - एक प्राथमिक शिक्षक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com