MLA Samadhan Awtade: आठ दिवसात रोजगार हमी योजनेतील विहिरी सुरू करा: आमदार समाधान आवताडे यांच्या आढावा बैठकीत पंचायत समिती प्रशासनाला सूचना

Avtade’s Review Meeting: अनेक घरकुलांचे मस्टर व्यवस्थित काढले जात नाहीत घरकुल हे बेघरांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. त्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सर्व प्रशासनाने नियमाचा खोडा न घालता बेघराला निवारा देण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना आमदार समाधान आवताडे यांनी पंचायत समिती प्रशासनाला दिल्या.
MLA Samadhan Avtade directs Panchayat Samiti to begin Employment Guarantee Scheme wells within 8 days.

MLA Samadhan Avtade directs Panchayat Samiti to begin Employment Guarantee Scheme wells within 8 days.

Sakal

Updated on

-महेश पाटील

सलगर बुद्रुक : तीन-तीन गट विकास अधिकारी बदलून गेले मात्र आम्ही विहीर मंजूर असूनही कार्यारंभ आदेशासाठी हेलपाटे मारत आहोत. तरी यंदा तरी आम्हाला विहिरीचा लाभ मिळेल का अशी याचना अनेक शेतकऱ्यांनी आमदार समाधान आवताडे यांच्यासमोर मांडले असता येत्या आठ दिवसात रोजगार हमी योजनेच्या विहिरींचा प्रश्न निकाली काढा. अन्यथा तुमच्यावर कारवाई करण्यासाठी मला भाग पाडू नका. अनेक घरकुलांचे मस्टर व्यवस्थित काढले जात नाहीत घरकुल हे बेघरांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे त्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सर्व प्रशासनाने नियमाचा खोडा न घालता बेघराला निवारा देण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना आमदार समाधान आवताडे यांनी पंचायत समिती प्रशासनाला दिल्या ते मंगळवेढा येथील जोगेश्वरी मंगल कार्यालय येथे आयोजित केलेल्या आढावा बैठकीत बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com