"पक्षाची ओळख बाजूला ठेवून भाजप कार्यकर्ता मराठा आंदोलनात सहभागी होईल !'

आमदार सुभाष देशमुख म्हणाले, मराठा आरक्षण आंदोलनात भाजप कार्यकर्ते सहभागी होणार
Subhash Deshmukh
Subhash DeshmukhCanva

दक्षिण सोलापूर : मराठा आरक्षणासाठीच्या कायदेशीर लढाईत (Legal battle for Maratha reservation) महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi government) कच खाल्ली असल्याने, आता आरक्षण मिळविण्यासाठी समाजाकडून जी आंदोलनात्मक पावले टाकली जातील, त्यामध्ये भाजपचा (BJP) प्रत्येक कार्यकर्ता पक्षाची ओळख बाजूला ठेवून मराठा आंदोलकांच्या खांद्याला खांदा लावून सहभागी होईल, अशी ग्वाही माजी सहकारमंत्री व आमदार सुभाष देशमुख (MLA SUbhash Deshmukh) यांनी दिली. (MLA Subhash Deshmukh said that BJP activists will participate in the Maratha reservation movement)

Subhash Deshmukh
ग्रामीणमध्ये बुधवारपासून दहा दिवसांचा कडक लॉकडाउन !

आरक्षण हा राज्यातील मराठा समाजाच्या विकासाचा व समाजातील तरुणांच्या भवितव्याचा मुद्दा असतानाही महाविकास आघाडी सरकारने कायदेशीर लढाईत कुचराई केल्याचा आरोप आमदार देशमुख यांनी केला. फडणवीस सरकारने या मुद्द्यावर घटनात्मक कार्यवाही करून दिलेल्या आरक्षणाचा देखील आघाडी सरकारने मुडदा पाडला. त्यामुळे यापुढे आरक्षणा संदर्भात मराठा समाजाच्या नावाने व नेतृत्वात जी आंदोलने होतील त्यामध्ये भाजप पक्षीय ओळख बाजूला ठेवून सहभागी होईल, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार राज्यात होणाऱ्या आंदोलनांमध्ये भाजपचे कार्यकर्ते सहभागी होतील. आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचा भाजपचा निर्धार आहे, असेही आमदार देशमुख यांनी म्हटले आहे.

Subhash Deshmukh
जिल्ह्यातील लस संपली! झेडपी अध्यक्षांच्या पत्राचीही दखल नाही

मराठा समाजास आरक्षण देण्याची आघाडी सरकारची मानसिकताच नसल्याने आघाडी सरकारने मराठा समाजाची घोर फसवणूक केली आहे, हे सर्वोच्च न्यायालयाचे निकालपत्र वाचल्यावर उघड होते. ठाकरे सरकारने ही फसवणूक थांबवावी व समाजास न्याय मिळावा यासाठी सरकारला जागे करणे गरजेचे आहे. त्यासाठी होणाऱ्या प्रत्येक राज्यव्यापी आंदोलनात भाजपचा सक्रिय सहभाग राहील, असे ते म्हणाले. राज्यातील मागासवर्गीय आयोगाची मुदत संपल्यानंतर नवा आयोग स्थापन करण्यातही महाविकास आघाडी सरकार चालढकल करत असून, त्यावरूनच आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारची नकारात्मक मानसिकता स्पष्ट होत आहे, असा आरोपही आमदार देशमुख यांनी केला आहे. वेळकाढूपणा करून मराठा समाजाचा प्रक्षोभ शांत करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा डाव हाणून पाडला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

बातमीदार : श्‍याम जोशी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com