जिल्ह्यातील लस संपली! झेडपी अध्यक्षांच्या पत्राचीही दखल नाही

सोलापूर जिल्ह्यातील केंद्रांवरील लस संपल्याने मंगळवारी लसीकरण नाही
कोरोना लस
कोरोना लस File photo

सोलापूर : जिल्ह्यातील 18 वर्षांवरील तीस लाख व्यक्तींना लस (Corona Vaccine) टोचणे अपेक्षित आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा (Covid-19) प्रादुर्भाव वाढत असून मृत्यूदरही आटोक्‍यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर लस टोचण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढत आहे. मात्र, सोमवारी जिल्ह्यातील सर्वच केंद्रावरील लस संपल्याने ही केंद्रे बंद ठेवावी लागली. आता 50 हजार डोसची मागणी नोंदवण्यात आली असतानाही वरिष्ठ स्तरावरून कोणताही निरोप नसल्याने मंगळवारीही (ता. 18) केंद्रे बंद ठेवावी लागणार आहेत. (No vaccination on Tuesday as vaccinations at the centers in Solapur district have run out)

कोरोना लस
जिल्ह्यातील टेस्टिंग 13 लाखांच्या टप्प्यावर !

संपूर्ण राज्यात लसीचा तुटवडा असल्याने आता 84 दिवस पूर्ण झाल्यानंतर दुसरा डोस टोचला जाणार आहे. तर 18 ते 44 वयोगटातील तरुणांचे लसीकरण हे बंद करण्यात आले आहे. 45 वर्षांवरील सर्वच व्यक्तींना पहिला डोस टोचण्याला प्राधान्य दिले जात आहे. परंतु, लसीअभावी सोलापूर जिल्ह्यातील 339 केंद्रे वारंवार बंद ठेवावी लागत आहेत. आतापर्यंत वैद्यकीय कर्मचारी, फ्रन्टलाइन वर्कर्स, पूर्वीचे गंभीर आजार असणारे व साठ वर्षांवरील व्यक्तींसह 18 ते 44 वयोगटातील चार लाख 77 हजार 202 व्यक्तींना लस टोचण्यात आली आहे. त्यामध्ये तीन लाख 74 हजार 606 जणांनी पहिला डोस घेतला असून 1 लाख 2 हजार 596 जणांनी दुसरा डोस टोचून घेतला आहे. शहरातील दोन लाख 97 हजार 923 तर ग्रामीण मधील सुमारे अडीच लाख व्यक्तीने आतापर्यंत लस टोचून घेतली आहे. आणखी 25 लाख व्यक्तींना लस टोचणे अपेक्षित आहे.

कोरोना लस
माणसाच्या नरडीचा घोट घेणारा 'देवमाणूस'!

"ग्रामीण'मध्येही आता लसीकरणापूर्वी नोंदणी बंधनकारक

ग्रामीण व शहरी भागातील 339 केंद्रांवर लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, मागणीच्या प्रमाणात एकदाही लस न मिळालेले अजूनही या संपूर्ण केंद्रांवर लसीकरण सुरू झालेली नाही. लसीच्या उपलब्धतेनुसार केंद्रे सुरू केली जात आहेत. दरम्यान, लस कमी आणि लसीकरण केंद्रांवर गर्दी अधिक होत असल्याने आता ग्रामीण भागातील नागरिकांनाही लसीकरणापूर्वी स्वतःहून नोंदणी करणे बंधनकारक केले जाणार आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. त्यांच्या मंजुरीनंतर त्यानुसार कार्यवाही केली जाणार आहे. सध्या आधार कार्डतथा मतदान ओळखपत्र घेऊन ग्रामीण भागातील नागरिकांची लसीकरण केंद्रावरच नोंदणी करून त्यांना लस टोचली जात आहे. मात्र, लसीकरण केंद्रांवरील गर्दी वाढत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

झेडपी अध्यक्षांच्या पत्राचीही दखल नाही

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी सोलापूर जिल्ह्यातील 30 लाख व्यक्तींना लस टोचण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे व पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन दिले आहे. एका टप्प्यात सहा लाख डोस मिळावेत जेणेकरून लसीकरणाचे उद्दिष्टे लवकरात लवकर पूर्ण होऊन कोरोनाचा उद्रेक थांबेल आणि मृत्युदरही आटोक्‍यात येईल, असा विश्वास त्यांनी पत्रातून व्यक्त केला आहे. मात्र, त्यांनी पत्र पाठवूनही सोलापूर जिल्ह्यासाठी पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. तत्पूर्वी, आरोग्य समितीच्या सभापतींनीही पत्र पाठवून लसीची मागणी केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com