esakal | "विडी व यंत्रमाग कामगारांच्या लसीकरणासाठी विशेष मोहीम घ्या' - आमदार देशमुख
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Deshmukh

विडी व यंत्रमाग कामगारांच्या लसीकरणासाठी विशेष मोहीम घ्या - आमदार देशमुख

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

विडी व यंत्रमाग कामगारांसाठी विशेष मोहीम घेऊन त्यांना लस द्यावी, शहराला जास्तीत जास्त लस उपलब्ध करून घ्याव्यात, अशी मागणी आमदार विजयकुमार देशमुख यांनी केली.

सोलापूर : शहरामध्ये लसीकरण (Vaccination) हे मंदगतीने सुरू आहे. यामध्ये कामगार वर्गाला कमी प्रमाणात लस मिळत आहे. महापालिका आयुक्तांनी काढलेल्या आदेशानुसार विडी व यंत्रमाग कामगारांनी लस घ्यायला हवी किंवा आरटीपीसीआर टेस्ट (rtpcr test) निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक केले आहे. अन्यथा कामगारांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत कामगारांनी जगायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे. त्यामुळे आज (गुरुवारी) आमदार विजयकुमार देशमुख यांनी नवी पेठ येथील संपर्क कार्यालयामध्ये महापौर, आयुक्त, सभागृहनेते व विडी उद्योग समूहाचे अध्यक्ष, सचिव यांच्यासमवेत बैठक घेतली. विडी व यंत्रमाग कामगारांसाठी विशेष मोहीम घेऊन त्यांना लस द्यावी, शहराला जास्तीत जास्त लस उपलब्ध करून घ्याव्यात, अशी मागणी या वेळी आयुक्तांकडे आमदार विजयकुमार देशमुख (MLA Vijaykumar Deshmukh) यांनी केली. (MLA Vijaykumar Deshmukh demanded a special campaign for vaccination of bidi workers)

हेही वाचा: चर्चेला उधाण ! बागल गटाच्या नगरसेवकांकडून जगतापांचे कौतुक

सोलापूर शहराला जास्तीत जास्त लसींचा साठा उपलब्ध करून घ्यावा. आठवड्यामधील एक दिवस विडी व यंत्रमाग कामगारांना लस द्यावी, अशी मागणी महापौर श्रीकांचना यन्नम (Mayor Srikanchana Yannam) यांनी आयुक्तांकडे बैठकी दरम्यान केली. आधीच लॉकडाउनमुळे (Lockdown) विडी व यंत्रमाग कामगार हे अडचणीत आलेले आहेत. आयुक्तांनी घातलेल्या निर्बंधांमुळे हातावरचे पोट असणाऱ्या विडी व यंत्रमाग कामगारांना घरी बसावे लागत आहे. त्यामुळे आयुक्तांनी लसीकरणासाठी लवकरात लवकर विशेष मोहीम घ्यावी, अशी मागणी सभागृहनेते शिवानंद पाटील (Shivanand Patil) यांनी केली.

हेही वाचा: "जि. प. कर्मचाऱ्याचे 21 लाखांचे वैद्यकीय बिल दोन आठवड्यांत द्या!'

येत्या दोन ते तीन दिवसांत लसीचा साठा जास्त प्रमाणात कसा उपलब्ध होईल याचा प्रयत्न करेन. विशेष मोहीम घेऊयात, असे आश्‍वासन आयुक्त पी. शिवशंकर (Municipal Commissioner P. Shivshankar) यांनी या वेळी दिले. या वेळी आमदार विजयकुमार देशमुख, महापौर श्रीकांचना यन्नम, आयुक्त पी. शिवशंकर, सभागृहनेते शिवानंद पाटील, परिवहन सभापती जय साळुंखे, नगरसेवक विनायक विटकर, विडी उद्योग संघाचे अध्यक्ष सुनील क्षत्रिय, सचिव बाळासाहेब जगदाळे, ओमशेठ तिवाडी आदी उपस्थित होते.

loading image