नाहीतर मनसे करणार खळ्ळखट्याक; "कोरोना'ची डायलर टोन मराठीतच हवी 

MNS aggressive on Coronas dialer tone
MNS aggressive on Coronas dialer tone

सोलापूर : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसने महाराष्ट्रातही हात पाय पसरायला सुरवात केली आहे. दररोज "कोरोना'ची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढच होत आहे. त्यामुळे प्रशासनही प्रतिबंधक उपाय म्हणून वेगवेगळे निर्णय घेत आहे. याबाबत जागृतीही केली जात आहे. त्यातच "कोरोना'ने भारतात प्रवेश केल्यानंतर प्रत्येकापर्यंत माहिती पोचावी म्हणून फोनवर डायलर टोन वाजत आहेत.

मात्र, या डायलर टोन हिंदी आणि इंग्रजी या दोनच भाषेत असल्याने नागरिकांत संभ्रम निर्माण होत आहे. अनेकांना काय सांगितले जात आहे, हेच समजत नाही. त्यामुळे मराठी सक्तीसाठी आंदोलन करणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता यावर आक्रमक होणार आहे. महाराष्ट्रात ही डायलर टोन मराठीतूनच असावी, अशी मागणी करणार आहे. 
चीन येथून सुरू झालेला कोरोना बाहेरच्या देशातही पसरला आहे. भारतात त्याचे रुग्ण आढळून आले. त्यानंतर महाराष्ट्रात पुणे येथे रुग्ण आढळला. त्यानंतर मुंबई, नगर या शहरातही रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई यासह काही जिल्ह्यांत सरकारने उपाययोजना म्हणून शाळा, महाविद्यालये, सिनेमागृह बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना व्हायरस पसरू नये म्हणून नागरिकांनी घाबरून न जाता काय काळजी घ्यावी याबाबत सरकारकडून जागृती केली जात आहे. रेल्वेसह सार्वजनिक ठिकाणी याबाबत जागृती करणारे फलक लावण्यात आले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात रुग्णाललयांत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून राखीव बेड ठेवण्यात आले आहेत. 
सध्या सगळ्यांकडे फोन आहेत, हेच लक्षात घेऊन प्रत्येक माणसांपर्यंत याची माहिती पोचावी व जागृती व्हावी म्हणून फोन लावल्याबरोबर कोरोनाची माहिती आणि प्रतिबंधक उपाय सांगितला जात आहे. मात्र, हिंदी आणि इंग्रजी या दोनच भाषेत ही माहिती सांगितली जात आहे. त्यामुळे मराठी नागरिकांना ही माहिती समजत नाही. 

निवेदन देणार... 
कोरोना हे मोठे संकट आहे. त्यावर राजकारण करण्याचा हेतू नाही. मात्र, जनजागृतीसाठी सरकार यावर एवढा खर्च करत आहे. त्याच भाग म्हणजे फोनवरील डायलर टोन. ही डायलर टोन मराठी सोडून इतर भाषेत आहे. त्यामुळे अनेकांना काय सांगितले जात आहे, हे समजत नाही. त्यामुळे ही डायलर टोन महाराष्ट्रात मराठीतूनच असावी या मागणीचे पहिल्यांदा निवेदन देण्यात आहे. त्यानंतर पुढे काय होते हे पाहून निर्णय घेऊ. 
- विनायक महिंद्रकर, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com