
सोलापूर : हातात भारीचा मोबाईल पण आहारात स्वतः आणि चिमुकल्यांना काय खाऊ घालायचे याची माहिती नसलेल्या माता अशी स्थिती सध्या आहे. त्यामुळे महिला स्वतःही सकस आहार घेत नाहीत व मुलांना कुरकुरे खायला देतात असे सामाजिक निरीक्षणातून समोर आले आले. शहरात कुपोषित माता व बालकांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी विशेष प्रकल्प राबवला जातो. महानगर पालिकेने हा सुरू केलेला राज्यातील एकमेव प्रकल्प आहे. या प्रकल्पात वजन कमी असलेल्या माता व बालकांना चौदा दिवस केंद्रात ठेवून त्यांना योग्य पोषणयुक्त आहार दिला जातो.