esakal | कोणी काही म्हणो, जिल्ह्याचे नेतृत्व मोहिते-पाटीलच करू शकतात !
sakal

बोलून बातमी शोधा

कोणी काही म्हणो, जिल्ह्याचे नेतृत्व मोहिते-पाटीलच करू शकतात !

आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांना कोरोनाचा संसर्ग झाला. राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यावर नाहक टीका करून सोशल मीडियावर त्यांना कोरोना झालाच नाही त्यांनी निवडणूक रिंगणातून पळ काढला आहे, अशा पद्धतीने प्रचार केला होता.

कोणी काही म्हणो, जिल्ह्याचे नेतृत्व मोहिते-पाटीलच करू शकतात !

sakal_logo
By
सुनील राऊत

नातेपुते (सोलापूर) : पंढरपूर - मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निकालावर सोलापूर जिल्ह्याचे आणि जिल्ह्याच्या राजकारणाची पुढील दिशा ठरणार हे 'सकाळ'ने भाकीत केले होते. त्याप्रमाणे निकाल जाहीर झाला असून पंढरपूर मंगळवेढा येथील जनतेने भारतीय जनता पक्षाच्या समाधान आवताडे यांना स्पष्ट बहुमत दिले आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या भगीरथ भालके म्हणजेच राष्ट्रवादी कॉंग्रेसला नाकारले आहे.

या पोट निवडणुकीचे प्रचारप्रमुख आणि ज्यांनी ही निवडणूक शिरावर घेतली होती ते करमाळ्याचे आमदार आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निष्ठावंत अनुयायी संजय मामा शिंदे, माळशिरस तालुक्‍यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते उत्तमराव जानकर आदींनी भारतीय जनता पक्षाच्या समाधान आवताडे यांच्याविषयी किंवा भारतीय जनता पक्षाविषयी प्रचार सभेत टिका टिप्पणी न करता माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, त्याचे चिरंजीव आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर वैयक्तिक पातळीवर जाऊन टिका टिप्पणी केली होती.

हेही वाचा: कांद्याचा वांदा ! बाजारपेठा बंद; उत्पादक शेतकरी अडचणीत

मोहिते पाटील यांनी या टिकेला कोणतेही प्रत्युत्तर न देता पंढरपूर आणि मंगळवेढा या मतदार संघातील आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना अतिशय चोखपणे आणि प्रामाणिकपणे भाजपचे काम करण्यास सांगितले होते. दरम्यान, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांना कोरोनाचा संसर्ग झाला. राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यावर नाहक टीका करून सोशल मीडियावर त्यांना कोरोना झालाच नाही त्यांनी निवडणूक रिंगणातून पळ काढला आहे, अशा पद्धतीने प्रचार केला होता.

आमदार रणजितसिंह यांच्या अनुपस्थितीत शिवामृत दूध संघाचे चेअरमन, भारतीय जनता पक्षाचे युवक नेते धैर्यशील मोहिते पाटील, अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी या मतदारसंघात सहकाऱ्यांसह पूर्ण वेळ थांबून प्रचार यंत्रणा प्रामाणिकपणे राबवली होती. आणि मतदानातूनच या जिल्ह्याचे नेतृत्व कोण करू शकते हे दाखवून दिले आहे.

loading image