Mohol News : मोहोळ वाशीयांनी अखेर घेतला मोकळा श्वास; 'ट्रॅफिक जॅम'ची समस्या निकालात

अपघातांचा 'ब्लॅक स्पॉट' म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या मोहोळ येथील कन्या प्रशाला चौकातील उड्डाण पुलाचे मागील दहा महिन्यापूर्वी सुरु झालेले काम पूर्णत्वास आले.
Mohol Flyover
Mohol FlyoverSakal

मोहोळ - अपघातांचा 'ब्लॅक स्पॉट' म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या मोहोळ येथील कन्या प्रशाला चौकातील उड्डाण पुलाचे मागील दहा महिन्यापूर्वी सुरु झालेले काम पूर्णत्वास आले असुन, मोहोळहुन सोलापूरकडे जाणारी एक लेन सुरु झाल्याने 'ट्रॉफीक जॅम'च्या समस्येने वैतागलेल्या मोहोळ वाशीयांनी अखेर मोकळा श्वास घेतला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, गेल्या सुमारे 15 वर्षा पूर्वी सुरु झालेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरी मुळे शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या कन्या प्रशाला चौकात विविध महाविद्यालये व नागरी वस्ती मुळे रस्ता ओलांडताना अनेक आपघात झाले, तर त्यात अनेकाना जीव गमवावा लगाला होता. अनेकांना कायमचे अंपगत्व आले आहे.

या चौकात उड्डाण पुल व्हावा या मागणी साठी शहरातील विविध सामाजिक संघटना सह राजकीय पक्षांनी विविध आंदोलने केली होती. या अंदोलनाची दखल घेत कन्या प्रशाला चौकातील उड्डाण पुलाला मंजुरी मिळाली. त्याचे काम मागील 10 महिन्या पासुन सुरु आहे.

परंतु शहरी वसाहत, विविध शाळा, दोन्ही बाजुला व्यापारी पेढया, दोन्ही बाजुला केलेल्या रस्ते दुभाजकाची जागा कमी आसल्याने व दोन्ही बाजूने सर्विस रस्ता अरुंद असल्याने, गटारीचे लोखंडी बार आडवे आसल्याने गटारींना मोठमोठे भगदाड पडलेले आहेत. याशिवाय दोन्ही बाजुने नविन गटारी बांधताना पाडलेले खड्डे यामुळे दोन्ही बाजूच्या वाहतुकीस प्रचंड अडथळा निर्माण होत होता.

यामुळे तासन तास दोन्ही बाजूनी वाहनांच्या रांगा लागत होत्या. अशा परिस्थितीत विविध शाळा, महाविद्यालये याच रस्त्यावर आसल्याने विद्यार्थ्यांना जिव मुठीत घेऊन शाळेला जावे लागत होते. सर्विस रस्त्यावर टाकलेल्या खडीमुळे रात्री अपरात्री मोटार सायकल घसरुन दररोज आपघातांच्या प्रमाणात वाढ झाली होती. याबाबत वेळोवेळी आंदोलने, उपोषणे ही झाली होती.

याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने दोन्ही बाजूच्या सर्विस रस्त्याला सुरक्षा रक्षक नेमून, वाहतुक सुरळीत करावी, रस्त्यावर येणारे अडथळे दूर करावेत, व हे काम तातडीने पूर्ण करावेत अशी मागणी केली होती. याची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने रात्र व दिवस काम करुन एक लेन सुरु करणार असल्याचे आश्वासन दिले होते.

दिलेल्या आश्वासना प्रमाणे काम करुन मोहोळ ते सोलापूर जाणारी एक लेन सुरु केली. त्यामुळे मागील 10 महिन्यापासुन 'ट्रॉफीक जॅम'च्या समस्येने हैराण झालेल्या वाहन चालकासह धुळीला कंटाळलेल्या मोहोळ वाशीयांनी मोकळा श्वास घेतला आहे.

वाहतुक सुरू झाल्याने वाहन चालका सह व्यापारी बांधवानी या कामाचे व्यवस्थापक रुषभ बघेल, गौतम सिंघानिया, मनदीप कौशिक यांचा सत्कार, व्यापारी चैतन्य देशमुख, प्रसाद देशमुख, सचिन गायकवाड, संजय पडवळकर, दिनेश गुरव यांनी केला.

या वेळी ट्रॉफीक हवालदार सिध्देश्वर बाबर यांनी हिरवा झेंडा दाखवुन वाहतुक सुरु केली. दुसरीही लेन जानेवारी अखेर पूर्ण करुन उड्डाण पुलाचे काम पूर्ण करु असे अश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com