मोहोळ : "भिमा" च्या पंचवार्षीक निवडणुकीची चाहुल लागली

भीमा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.
 अध्यक्ष धनंजय महाडिक
अध्यक्ष धनंजय महाडिकsakal

मोहोळ : संपूर्ण जिल्ह्यात विविध विषयामुळे चर्चेत असलेल्या टाकळी सिकंदर ता मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक प्रक्रियेची चाहूल लागली असून, प्रारुप मतदार यादीवर दाखल झालेल्या हरकती ची मंगळवार ता 24 रोजी प्रादेशिक उपसंचालक( साखर) कार्यालयात सुनावणी झाली.या हरकतींचा निकाल येत्या 30 मे रोजी जाहीर होणार असल्याची माहिती प्रादेशिक उपसंचालक राजेंद्र दराडे यांनी दिली.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. सोमवार ता 9 मे रोजी सुमारे 18 हजार 600 सभासदांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली. मतदार यादी वर हरकती घेण्यासाठी 18 मे पर्यंत मुदत होती.या प्रसिद्ध झालेल्या यादीतून भाग भांडवलाची रक्कम अपुरी असणे, तसेच उपप्रादेशिक सहसंचालकांच्या निकालामुळे काही नावे वगळण्यात आली होती. त्यावर विरोधी गटाने सुमारे सोळाशे ते सतराशे हरकती नोंदवल्या होत्या. त्याची मंगळवारी दिवसभर उपसंचालक दराडे यांनी सुनावणी घेतली. दोन्ही बाजूच्या वकिलानी आपापली बाजू भक्कम मांडून युक्तिवाद केला.

जे सभासद येत्या 27 तारखे पर्यंत भाग भांडवलाची अपुरी रक्कम भरतील व पावती सादर करतील त्यांची नावे मतदार यादीत सामाविष्ट करण्यात येतील असे उपसंचालक दराडे यांनी सांगितले. अंतिम मतदार यादी 6 जून रोजी प्रसिद्ध होणार असल्याची माहितीही उपप्रादेशिक संचालक दराडे यांनी दिली.कारखान्याच्या वतीने अॅड.सूरेश इनामदार यांनी तर विरोधी गटाकडुन अॅड.उमेश मराठे यांनी काम पाहीले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com