Solapur : "भिमा" ची निवडणूक बिनविरोध होणार का की निवडणूक लागणार उत्सुकता शिगेला

मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.
solapur
solapur sakal

मोहोळ : टाकळी सिकंदर ता मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून ते आज तागायत कारखान्याचे अध्यक्ष खा धनंजय महाडिक यांनी शेतकरी व कारखाना हितासाठी निवडणूक बिनविरोध करावी असे आवाहन विरोधकांना केले आहे. मात्र निवडणूक बिनविरोध होणार की लागणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान दाखल केलेले उमेदवारी अर्ज माघार घेण्याची तसेच चिन्ह वाटपाची घटिका समीप आल्याने सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

टाकळी सिकंदर येथील भीमा कारखान्यावर पंढरपूरचे माजी आमदार स्व सुधाकर परिचारक व मोहोळ चे माजी आमदार राजन पाटील यांचे सुमारे २५ वर्ष वर्चस्व होते. मात्र दहा वर्षांपूर्वी सभासदांनी बदल करून कारखान्याच्या सत्तेच्या चाव्या खा महाडिक यांच्याकडे दिल्या.अत्यंत संघर्ष करून मिळवलेली सत्ता टिकविण्याचे मोठे कसब खा महाडिक यांच्याकडे आहे.

कारखान्याचे कार्यक्षेत्र जास्त असल्याने अतिरिक्त उसाचा प्रश्न भेडसावत होता. तसेच सभासदांना इतर कारखान्या प्रमाणे दर द्यायचा म्हणले तरी उपपदार्थ निर्मिती शिवाय पर्याय नाही हे ओळखून खा महाडिक यांनी कर्ज घेऊन कारखान्याचे विस्तारीकरण केले. २५ मेगॅवॅट चा सहवीज निर्मिती प्रकल्प सुरू केला. त्यामुळे कारखान्याला सुगीचे दिवस आले.

दरम्यान खा महाडिक यांनी निवडणुकीत दिलेल्या सर्व जाहीरनाम्याचे पालन व दिलेला शब्द खरा केला मात्र गेल्या दोन-तीन हंगामातील दुष्काळामुळे कारखान्याची घडी विस्कटली होती. सन २०२१/२२

या गळीत हंगामात चांगले गाळप करून विस्कटलेली घडी बसविण्याचा प्रयत्न खा महाडिक यांनी केला. दरम्यान कारखान्याच्या विरोधात विरोधकांनी अनेक ठिकाणी तक्रारी केल्याने खा महाडिक यांच्या अडचणीत वाढ झाली. त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागला. त्याचा परिणाम कारखान्याच्या दैनंदिन कामकाजावरही झाला होता.

पण मागे हटतील ते महाडिक कसले याप्रमाणे त्यांची केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या बरोबर जवळीक झाली. महाडिक यांनी मोठे मन करून आपल्याच नाही तर संपूर्ण देशातील साखर कारखानदारीच्या अडचणी मंत्री शहा यांच्या समोर मांडल्या त्याचे फलित म्हणून सर्व साखर कारखान्यांचे ८ हजार ३०० कोटीचे कर्ज माफ झाले.

निवडणुक प्रक्रियेतील बैठका गाठीभेटींना ऊत आला आहे. सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील व पंढरपुरचे युवा नेते प्रणव परिचारक हे दोन युवक कारखान्याच्या विरोधातली बाजू सभासदा समोर मांडत आहेत. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. विरोधक म्हणतात खा महाडिक यांनी कारखाना कर्जाच्या खाईत लोटला, त्यामुळे कर्जमुक्त होणे अडचणीचे आहे. तर खा महाडिक म्हणाले तुम्ही तुमचे कारखाने व उपपदार्थ निर्मितीसाठी कर्ज काढले होतेच की, ते तुम्ही फेडले. सहकारी साखर कारखाने खाजगी केले.

मी ही कर्ज काढूनच विस्तारीकरण व सहवीस निर्मिती प्रकल्प उभा केला आहे. हे तुम्ही तुमच्या २५ वर्षाच्या कार्यकालात का केले नाही. कर्जाची चिंता करू नये त्यासाठी मी खंबीर असल्याचे खा महाडिक यांनी सांगितले. येत्या गळीत हंगाम संपल्यावर इथेनॉल प्रकल्पाचे काम सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

खा महाडिक यांचे सुपुत्र विश्वजीत महाडिक हे उच्च शिक्षा विभूषित आहेत. त्यांनी गेल्या आठवड्या पासून सुमारे २५ गावाचा दौरा केला. होम टू होम जाऊन सभासदांच्या अडचणी जाणून घेतल्या. स्व. भीमराव (दादा) महाडिक यांचा नातू म्हणून त्यांच्या दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com