

Shinde Sena leader extends financial help to a child orphaned after a farm pond drowning tragedy in Mohol taluka.
sakal
मोहोळ : कोर्टी ता पंढरपूर येथे शेततळ्यात बुडून मृत पावलेल्या पाटकुल ता मोहोळ येथील लोंढे कुटुंबीयाच्या वारसाला शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांनी रोख 50 हजाराची आर्थिक मदत दिली. या मदती मुळे लोंढे कुटुंबीयातील एकमेव चिमुकला "यश" याच्या जीवनात आशेचा किरण निर्माण झाला आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी की, पाटकुल ता मोहोळ येथील लोंढे कुटुंबीय मजुरीसाठी कोर्टी येथील एका शेतकऱ्याकडे काम करीत होते.