Mohol News : एका दिवसात एक कोटी रुपयाचा दंड वसूल, तर बालविवाह रोखण्यासाठी करणार प्रयत्न

मोहोळ तालुक्याचे सुपुत्र तथा पुरवठा उपायुक्त त्रिगुण कुलकर्णी यांची बीडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली.
Additional Collector trigun kulkarni
Additional Collector trigun kulkarnisakal

मोहोळ - मोहोळ तालुक्याचे सुपुत्र तथा पुरवठा उपायुक्त त्रिगुण कुलकर्णी यांची बीडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. त्यांनी पदभार स्वीकारताच आपल्या धडाकेबाज कामाला सुरुवात केली असून, एका दिवसात एक कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. कुलकर्णी यांच्या या कामगिरीमुळे कामचुकार व वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, त्रिगुण कुलकर्णी यांनी त्यांच्या पुरवठा उपायुक्ताच्या कार्यकालात पुरवठा विभागात अनेक धाडसी निर्णय घेतले. शासनमान्य स्वस्त धान्य दुकानांचे त्यांनी रुपडे बदलले, तर धान्याचा होणारा काळाबाजार त्यांनी मोठ्या प्रमाणात रोखण्याचा प्रयत्न केला. संगणक प्रणाली मुळे व ऑनलाईन पद्धतीमुळे स्वस्त धान्य दुकानदारांना चांगली शिस्त लागली. वाळूची होणारी तस्करी ही त्यांनी बऱ्यापैकी बंद केली आहे.

बीडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारताच त्यांनी एका तासातच आपल्या कामाला सुरुवात केली. बीड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अनेक वाळू वाहतूक करणाऱ्या "हायवा" वर कारवाई करून त्यांनी एका दिवसातच एक कोटीचा दंड वसूल केला, त्यामुळे शासनाच्या महसुलात भरीव वाढ झाली आहे. त्यांनी त्यांच्या दालनात प्रवेश करताच त्यांना अनेक गोष्टी खटकल्या. शासकीय रेकॉर्ड नीट न ठेवल्याने त्याचे तुकडे झाले आहेत,ते सर्व स्कॅनिंग करण्यास सुरुवात केली आहे.

बीड जिल्ह्यात ऊस तोडणी कामगारांची संख्या मोठी आहे. त्यांच्यासाठी ऊस तोडणी कामगार महामंडळ स्थापुन त्या माध्यमातून त्यांना सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत, त्या परिसरात बालविवाहाचे प्रमाण मोठे आहे.

त्यासाठी नागरिकांचे प्रबोधन करून बालविवाह रोखण्याच्या कामाला प्रथम प्राधान्य देणार असल्याचे अतिरीक्त जिल्हाधिकारी कुलकर्णी यांनी सांगितले. येत्या आठवड्या भरात ऊस तोडणी कामगारांसाठी व गरीबा साठी निर्धूर चूल, अपंगासाठी जयपूर फूट, व कपड्यांचे वाटप करणार असल्याचेही अतिरिक्त जिल्हाधिकारी कुलकर्णी यांनी सांगितले.

सध्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत तोकडी आहे. त्यासाठी नवीन इमारतीसाठी सुमारे 80 कोटीचा प्रस्ताव मंजुरीसाठी वरिष्ठाकडे पाठविल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान "शासन आपल्या दारी" हा प्रशासनाचा उपक्रम चांगल्या पैकी राबवून जास्तीत जास्त सर्वसामान्यांना सुविधा देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी कुलकर्णी यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com