
मोहोळ : मोहोळहून कुरूलच्या दिशेने निघालेल्या दोन दुचाकीस्वारांना समोरून येणाऱ्या मालट्रकने धडक दिली. यात चौघेजण जखमी झाले. हा अपघात मोहोळ- मंद्रूप महामार्गावरील नजीक पिंपरी शिवारात रविवारी (ता. १७) सकाळी साडेअकरा वाजता झाला. अपघातानंतर ट्रकचालक न थांबता तसाच पुढे निघून गेला.