

Mohol Municipal Council Elections: Administration on High Alert
Sakal
मोहोळ : मोहोळ नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहोळ पोलीस प्रशासन सज्ज झाले असून, अधिकाऱ्या सह एकूण 68 पोलीस कर्मचारी व 65 होमगार्ड असा 133 कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात केला आहे. दरम्यान मतदान प्रक्रिया शांततेत व निर्भय वातावरणात संपन्न व्हावी यासाठी 150 जणावर विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे. तर 25 जण तडीपार केल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली.