
Mohol Municipal Council mayor post reserved for SC women, creating a surprising turn in local politics.
Sakal
-राजकुमार शहा
मोहोळ: संपूर्ण जिल्ह्यात चर्चेत असलेल्या मोहोळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण हे ‘अनुसूचित जाती महिला’ या प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. त्यामुळे राजकीय नेतेमंडळींचे सर्व अंदाज फोल ठरले आहेत. त्यामुळे विविध राजकीय पक्षांचे नेते भूमिगत झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, गेल्या तीन वर्षांपासून आपलेच आरक्षण निघेल, या भ्रामक कल्पनेने केलेले कष्ट वाया गेले आहेत.