

Shiv Sena Shinde Group Wins Big in Mohol Nagar Parishad
Esakal
मोहोळ नगरपरिषदेत शिवसेनेच्या सिद्धी वस्त्रे या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. वयाच्या २२ व्या वर्षी सिद्धी वस्त्रे नगराध्यक्ष बनलीय. मोहोळमध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने युती केली होती. सिद्धी वस्त्रेसह मोहोळमधील उमेदवारांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली होती. सिद्धी वस्त्रे यांच्यावर विरोधकांकडून टीकाही करण्यात आली होती. या टीकेला आता विजयानंतर सिद्धी यांनी प्रतिक्रिया देताना कामातून उत्तर देऊ असं म्हटलंय.