

Mohol Shocker: Seven Booked in Illegal Cattle Smuggling Case
Sakal
मोहोळ : मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवंशाची तस्करी व वाहतूक करणाऱ्या गुन्ह्याचे प्रमाण घडून गुन्हे दाखल झाले होते. सदरचे गुन्हे उघडकीस आणून त्यास प्रतिबंध करण्या कामी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक शेडगे यांनी पोलीस पथके तयार करून त्यांना सदरचे गुन्हे प्रतिबंधित करण्यासाठी आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर एकूण 7 जणावर मोहोळ पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे,त्यांना अटक करण्यात आली आहे.