
-राजकुमार शहा
मोहोळ : आषाढी वारीसाठी पंढरपुरला जाणाऱ्या वारक-यांची वारी सुखकर व्हावी या पार्श्वभूमीवर मोहोळ पोलीस ठाणे सज्ज झाले असून, येत्या दोन दिवसात वारकऱ्यांना माहिती देण्यासाठी मोहोळ येथे "वारकरी मार्गदर्शन केंद्र" सुरू करणार असल्याची माहिती मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली. दरम्यान पंढरपूर कडे जाणारी जड वाहतूक बंद करण्यात आली आहे.