Solapur News : मोहोळ पोलीस ठाण्यात भागवली नागरिकांची तहान, भविष्यात जलशुद्धीकरण यंत्रणा बसवणार - राऊत

सध्याचा कडक उन्हाळा लक्षात घेता मोहोळ पोलीस ठाण्याच्या वतीने कामासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी पाणपोई सुरू करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी दिली.
Mohol police station water purification system will be installed Raut
Mohol police station water purification system will be installed RautSakal

मोहोळ : सध्याचा कडक उन्हाळा लक्षात घेता मोहोळ पोलीस ठाण्याच्या वतीने कामासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी पाणपोई सुरू करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी दिली.

मोहोळ पोलीस ठाण्याच्या इतिहासात अशा प्रकारचा सामाजिक उपक्रम प्रथमच राबविण्यात आला आहे, त्यामुळे पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकासह पोलीस कर्मचारी, तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना याचा फायदा होत आहे.

सध्या अत्यंत कडक उन्हाळा सुरू आहे. सूर्य आग ओकतो आहे. ग्रामीण भागातून अनेक वृद्ध, महिला, युवक पोलीस ठाण्यातील कामासाठी येतात. मात्र त्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसते. प्रत्येक जण च पाण्याची बाटली विकत घेऊन पाणी पिऊ शकत नाही.

हीच अडचण ओळखून पोलीस निरीक्षक राऊत यांनी बुधवार ता 3 रोजी पाणपोई सुरू केली आहे. यामुळे याचा फायदा अनेकांना झाला आहे. उन्हाळा संपे पर्यंत हा उपक्रम सुरू राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक राऊत यांनी सांगितले. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांसाठी पाण्याची व सावलीची व्यवस्था करावी अशा सूचना काही दिवसापूर्वी दिल्या होत्या.

मोहोळ पोलीस ठाणे, तहसील कार्यालय, दुय्यम निबंधक व पुरवठा विभाग या ठिकाणी कामासाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी संख्या आहे. चांगल्या आरोग्यासाठी लवकरच जलशुद्धीकरण यंत्रणा बसविणार असल्याचे पोलीस निरीक्षक राऊत यांनी सांगितले, जेणे करून कायमस्वरूपी पाणीटंचाई दूर होणार आहे. यावेळी वाहतूक शाखेचे हवलदार एस एच बाबर, विक्रम दराडे, व अन्य पोलीस मित्र उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com