मोहोळ पोलिसांचा वाळूमाफियांवर मोठी कारवाई! 98 लाखांचा ऐवज जप्त

मोहोळ पोलिसांनी केली वाळू माफियांवर कारवाई करून मुद्देमाल जप्त केला
Sand Mafia
Sand Mafiacanva
Updated on
Summary

येथील स्मशानभूमीजवळ वाळूचा बेकायदा केलेला साठा मोहोळ पोलिसांनी पकडला असून, वाळू, सहा ट्रॅक्‍टर्स व एक जेसीबी असा एकूण 98 लाख 20 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

मोहोळ (सोलापूर) : एकुरके (ता. मोहोळ) येथील स्मशानभूमीजवळ वाळूचा बेकायदा केलेला साठा (Illegal storage of sand) मोहोळ पोलिसांनी (Mohol Police) पकडला असून, वाळू, सहा ट्रॅक्‍टर्स व एक जेसीबी असा एकूण 98 लाख 20 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. याप्रकरणी सहा जणांविरोधात मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विलास रामचंद्र ढेरे (रा. बोपले), अमोल भास्कर ढवन (रा. एकुरके), नानासाहेब चांगदेव साठे (रा. एकुरके), सोमनाथ नागनाथ कोल्हाळ (रा. एकुरके), उमेश भारत ढेरे (रा. बोपले), नीलेश उत्तम कोल्हाळ (रा. एकुरके) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. (Mohol police took action against the sand mafia and confiscated the goods)

Sand Mafia
जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये 13878 बेड शिल्लक ! ऑक्‍सिजनची घटली मागणी

यासंदर्भात मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या कोरोनाची महामारी सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र बंद व सर्व व्यवहार ठप्प आहेत. मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक सायकर, हवालदार गणेश पोफळे, हवलदार गुळवे, पोलिस कॉन्स्टेबल शिवणे, पोलिस कॉन्स्टेबल पुजारी आदी रविवारी (ता. 23) नरखेड हद्दीत गस्त घालत असताना, एकुरके शिवारातील स्मशानभूमीजवळ काही इसमांनी वाळू साठा केला असून, तो जेसीबीच्या साह्याने ट्रॅक्‍टरमध्ये भरून घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिस पथक त्या ठिकाणी गेले असता पोलिस आल्याची चाहूल लागताच वरील सहाजण पळून गेले. जवळ जाऊन पाहिले असता जेसीबीच्या साह्याने सहा ट्रॅक्‍टरमध्ये वाळू भरलेले निदर्शनास आले. आजूबाजूला चौकशी केली असता ही वाळू एकुरके गावचे पोलिस पाटील तानाजी भानुदास साठे यांच्या बांधकामासाठी घेऊन जात असल्याचे समजले.

Sand Mafia
कोरोनामुक्त झालेल्यांनी शंभर दिवस घ्यावी खबरदारी !

गावातील इतर नागरिक व पोलिसांच्या मदतीने जेसीबी नं. एम एच 13 डीई 7259, ट्रॅक्‍टर नं. एम एच 13 एजी 661 ट्रॉलीसह, एम एच 13 जे 8671, एम एच 13 डीजे 4938 तर तीन ट्रॅक्‍टरला नोंदणी क्रमांक नाहीत. असे एकूण सहा ट्रॅक्‍टर व जेसीबी पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिस ठाणे आवारात आणली आहेत. या घटनेची फिर्याद पोलिस कॉन्स्टेबल सत्यवान भारत जाधव (मोहोळ) यांनी दिली असून, तपास हवालदार गणेश पोफळे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com