Mohol News : मालट्रक अपघातात भांडी व्यापाऱ्याचा जागीच मृत्यु | Solapur News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajendra Upadhye

Mohol Accident : मालट्रक अपघातात भांडी व्यापाऱ्याचा जागीच मृत्यु

Mohol News- रस्ता ओलांडताना मालट्रकची धडक बसून झालेल्या अपघातात मोहोळ येथील भांडी व्यापाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवार ता.

12 मार्च रोजी रात्री पावणे अकरा वाजता, सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोहोळ शहरा नजीक असलेल्या नरखेड पुलाजवळ झाली. राजेंद्र पमुलाल उपाध्ये वय-55, रा. समर्थ नगर, मोहोळ असे मृत व्यापाऱ्याचे नाव आहे.

मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, जैन समाजाचा महत्त्वाचा असा महावीर जयंती सोहळा जवळ आला आहे. मोहोळ येथे महावीर जयंती साजरी करण्या बाबत समाजाची बैठक आयोजित केली होती.

बैठक संपवून राजेंद्र उपाध्ये व त्यांचे सहकारी मित्र जेवण करून येत होते. उपाध्ये हे ऍक्टिवा नंबर एमएच 13 डीएच 8068 वरून रस्ता ओलांडताना सोलापूरच्या दिशेने भरधाव येणाऱ्या मालट्रक क्र. केए 33/ बी 1219 हिने उपाध्ये यांना जोराची धडक दिली.

मालट्रक अंगावरून गेल्याने उपाध्ये यांचा जागीच मृत्यू झाला. मृत उपाध्ये यांचे मोहोळ येथील मुख्य रस्त्यावरील आंबेडकर चौकात भांडी विक्रीचा व्यवसाय आहे. अचानक झालेल्या या अपघातामुळे मोहोळ येथील जैन समाजावर दुःखाचे सावट पसरले आहे.

या अपघाताची फिर्याद प्रीतम राजेंद्र उपाध्ये वय 30 यांनी मोहोळ पोलिसात दिली असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ज्योतिबा पवार करीत आहेत.