Solapur : व्हिडिओ ऑपरेटर ते दिग्दर्शक... संघर्षमय प्रवास

मला आई-वडिलांनी शिक्षणासाठी बोर्डिंगमध्ये टाकले.
मंगेश बदर
मंगेश बदरsakal

सोलापूर : अंधेरीतील चंदेरी दुनिया पाहण्यासाठी कधी पुण्यात तर कधी मुंबईत आतापर्यंतचे आयुष्य व्यतिथ करताना हॉटेलमध्ये वेटर, तर कधी दूधवाला, कधी पेपरवाला तर कधी मोबाईल रिपेअरिंग करत हाती मिळेल ते काम करून दैनंदिन गरजा भागविल्या. अभिनेता होण्याच्या स्वप्नाने अखरे मंगेश बदर यांना मदार चित्रपटाचे दिग्दर्शक बनविले.

शेतकऱ्यांच्या जीवनाचे वास्तव मांडलेल्या मदार या चित्रपटाने फिल्म फेस्टिवलमध्ये तब्बल पाच पुरस्कार मिळवित यशाचे शिखर गाठले आहे. ‘कॉफी विथ सकाळ’मध्ये दिग्दर्शक मंगेश बदर यांनी आपल्या यशाचा प्रवास मांडला.

मंगेश बदर म्हणाले, शेतकरी कुटुंबात जन्माला आल्यामुळे पहाटे गायी-म्हशीचे शेण काढण्यापासूनच कामाला सुरवात होते. शेण काढणे, जनावर चरायला नेणे अशी बरीच घरातील कामे करून शाळेला जावे लागते. या साऱ्या परिस्थितीला कंटाळलो होतो. दुसरीकडे चित्रपटामधील सुख-सुविधांच्या आकर्षणाने फिल्मी दुनियेकडे वळलो. जीवनात सगळी सुखे मिळवायची असतील तर अभिनेता व्हायला पाहिजे,

असे मत १२ व्या वर्षीच मनात घर करून बसले होते. फायटिंग चित्रपटाचा प्रभाव तर मनावर खोलवर होता. यातून गावात यात्रेत किंवा महिन्यातून एकदा लागणारे पडद्यावरचे चित्रपट पाहण्याच वेडच लागले. चित्रपटाच्या नादाने वडिल्यांच्या खिशातून हळूच पैसे काढायचो. शाळेकडे तर पूर्णत: दुर्लक्षच होत. घरातले माझ्या या वागणुकीला कंटाळले होतो. मी शालेय जीवनातच शहराकडे वळलो.

मला आई-वडिलांनी शिक्षणासाठी बोर्डिंगमध्ये टाकले. एके दिवशी फिल्मी स्टाईलने एका मुलीला प्रपोज मारताना झाडावरून पडलो आणि हाथ फॅक्चर झाला. पुन्हा तीन महिन्यासाठी गावाकडे परतलो. पण घरात टीव्ही व इतर भौतिक सुविधा नव्हत्या. चित्रपट नाही पाहिला की, मन कासाविस होत असे. चित्रपट पाहण्याच जणू मला व्यसन जडले होते. त्यामुळे पुन्हा हेच माझे भविष्य म्हणून दहावी संपल्यानंतर मी पुणे गाठले. एका मित्राच्या सहाय्याने मोबाईल रिपेअरिंगच काम करू लागलो.

यातून योग्य मोबदला मिळू लागला. पण मन रमत नव्हते. वृत्तपत्रात चित्रपटांसंदर्भात विविध गोष्टी वाचताना लक्षात आले की, फिल्म संबंधित सर्व घडामोडी या मुंबईतच घडतात. त्यामुळे अंधेरीतील चंदेरी दुनियेत जायचे असेल तर आपल्या मुंबई गाठावी लागेल, असे ठाम मत झाले. कसेबसे बारावीपर्यंत जेमतेम गुणांसह उत्तीर्ण होऊन मुंबई गाठली.

मंगेश बदर
Solapur News : पुण्यातील व्यवसाय सोडून गोशाळेची उभारणी

पुन्हा मुंबईतही विविध कामे करून शेवटी पुण्यातील मोबाईल रिपेअरिंगची कला मित्राच्या मदतीने मुंबईत बहरु लागली. व्यवसाय जोमात सुरू झाला, पैसे चांगले मिळू लागले. पण मित्राने दुकान स्वत: चालवायला घेतला. पुन्हा आर्थिक विवंचना वाढू लागले, या सगळ्यातून बाहेर

हॉटेलमध्ये वेटरचे काम, मोबाईल कव्हर विक्री

फुकट चित्रपट पाहण्याची आणि राहण्याची सोय व्हावी म्हणून व्हिडिओ सेंटरमध्ये ऑपरेटर म्हणून काम करू लागलो. त्यानंतर पुण्यात एका कंपनीत काम केले. काही दिवस दूध वाटले, मोबाईल रिपेअरिंगची कामे केली. मुंबईत राहण्याची आणि जेवणाची सोय व्हावी म्हणून हॉटेलमधील वेटरची नोकरी केली. त्यानंतर ट्रेनमध्ये मोबाईलचे कव्हर विक्री, अशी एक ना अनेक, मिळेल ती कामे केल्याचे मंगेश बदर यांनी सांगितले.

मंगेश बदर
Solapur : लोकसहभागातून मंगळवेढ्यात पुतळ्याची उभारणी

दिग्गजांना मागे टाकत मिळविला विजय

फिल्म फेस्टव्हलसाठी सुप्रसिध्द अभिनेत्री माधुरी दिक्षित यांचा पंचक, प्रवीण तरडे यांच धर्मवीर, समर्थ शिंदे यांच ग्लोबल आडगाव, किशोर यांचा टेरीटेरी आणि गिरकी, अशा पाच दिग्गजांच्या चित्रपटाला मागे टाकत 'मदार' ने बाजी मारली.

आउटडेटेड कॅमेरा अन्‌ कॅमेऱ्याशी संबंध नसलेले कलाकार

मदार चित्रपट तयार करण्यासाठी लागणारा खर्च हा आवाक्या बाहेरचा होता. तरीही उपलब्ध साधनसामुग्रीमध्ये इंडस्ट्रीत आउटडेटेड झालेला कॅमेरा घेऊन चित्रपटाचे चित्रीकरण केले. शेतकऱ्यांचे जमिनीशी असलेले नाते दाखविणाऱ्या या चित्रपटात कॅमेराशी दूरदूरचा संबंध नसलेले परंतु खरे शेतकरी असलेले, वर्षानुवर्षे निसर्गाच्या खेळात तापून निघालेले कलाकार आहेत. तरीही बेस्ट ॲक्टर, बेस्ट डायरेक्टर, बेस्ट फिमेल ॲक्टर आणि बेस्ट सिनेमाटोग्राफी, असे पाच पुरस्कार मिळाले हे विशेष.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com