Mohol News : चालत्या कंटेनरने घेतला अचानक पेट; जीवीत हानी नाही

चेन्नईहून अहमदाबादकडे हयुंदाई कंपनीच्या आठ कार गाड्या घेऊन निघालेल्या कंटेनरला उष्णतेने वायरचे शॉर्टसर्किट होऊन मोहोळ शहरा नजीक अचानक आग लागली.
Container Fire
Container Firesakal

मोहोळ - चेन्नईहून अहमदाबादकडे हयुंदाई कंपनीच्या आठ कार गाड्या घेऊन निघालेल्या कंटेनरला उष्णतेने वायरचे शॉर्टसर्किट होऊन मोहोळ शहरा नजीक अचानक आग लागली. वेळीच परिसरातील ग्रामस्थांच्या मदतीने व अग्निशामक दलाच्या गाडीने आग विझवण्यात आली. या घटनेत कोणतीही जिवित हानी झाली नाही.

चेन्नईहून अहमदाबादकडे हयुंदाई कंपनीच्या आठ कार गाड्या घेऊन निघालेल्या कंटेनर क्रं एच आर 47 सी 9979 हा शहरा नजिक आसणाऱ्या उड्डाण पुलाजवळ येताच गाडीच्या केबीन मधे उन्हामुळे गरम झालेल्या वायरीगंचे शॉर्ट सर्कीट होऊन आग लागली.

आग लागताच गाडीतील ड्रायव्हर अमन कुमार याने सावधगीरी बाळगत गाडी रोडच्या कडेला घेत उडी मारली. व बॅटरीचे कनेक्शन तोडले. गाडीत दोघे जण होते. शहरानजिक घटना घडल्याने लगेच बघ्यांची गर्दी जमा झाली.

शेजारीच आसणाऱ्या सिनेमा ग्रहातुन पाण्याचा पाईप जोडुन नागरीकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान अनगर येथील लोकनेते साखर कारखान्याच्या अग्नीशामक दलाच्या गाडीला पाचारण करण्यात आले. गाडी येताच आग विझविण्यात आली. या घटनेत कोणतीही जिवित हानी झाली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com