Mohol Tahsil Office Area
Mohol Tahsil Office AreaSakal

Mohol News : मोहोळ तहसील कार्यालय आवाराला पाझर तलावाचे स्वरूप; अधिकारी, कर्मचारी डोळे असून आंधळे

मोहोळ तहसील कार्यालयाच्या आवारातील मुख्य प्रवेशद्वारा जवळ पाणी साचल्याने त्या ठिकाणी पाझर तलावाचे स्वरूप आले आहे.

मोहोळ - मोहोळ तहसील कार्यालयाच्या आवारातील मुख्य प्रवेशद्वारा जवळ पाणी साचल्याने त्या ठिकाणी पाझर तलावाचे स्वरूप आले आहे.

सर्वसामान्य नागरिक, वृद्ध व महिला यांना त्या ठिकाणाहून जाणे अडचणीचे झाले आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने घसरून पडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

गेल्या दोन दिवसा पासून मोहोळ शहरासह ग्रामीण भागात "आर्द्रा" नक्षत्राने हजेरी लावली आहे. मोहोळ शहरही याला अपवाद नाही. तहसील कार्यालयाच्या आवारातील मुख्य प्रवेशद्वारा जवळ चढ उतार झाला आहे.

पाऊस पडल्याने खड्ड्यात पाणी साचले आहे. दररोज तालुक्याच्या ग्रामीण भागातून शेकडो नागरिक कामासाठी येतात. त्यात वृद्ध, महिला, अपंग यांचा समावेश आहे. एखादा नागरिक खड्ड्या जवळून जाताना दुचाकी, चार चाकी वाहनाचे पाणी अंगावर उडाल्याने कायम संघर्ष होतो.

पोलीस ठाणे, दुय्यम निबंधक, पुरवठा व सेतू कार्यालय या ठिकाणी जाताना पाण्यातूनच जावे लागते. विशेष म्हणजे या वरील विभागातील अधिकारी, कर्मचारी याच पाण्यातून जातात, मात्र उपाय योजना होत नाही, त्यांना हा प्रकार दिसत नाही काय? असा प्रश्न सर्व सामान्यतून विचारला जातोय. त्वरित उपाय योजना करावी अशी मागणी नागरी मधुन होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com