Old Pension : मोहोळ तालुक्यातील 197 कर्मचारी संपावर; सर्वसामान्यांची झाली मोठी अडचण

'जुनी पेन्शन लागू करा' या मागणीसाठी मोहोळ तालुक्यातील विविध विभागातील एकूण 197 कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.
Panchyat Samiti Mohol
Panchyat Samiti Moholsakal

मोहोळ - 'जुनी पेन्शन लागू करा' या मागणीसाठी मोहोळ तालुक्यातील विविध विभागातील एकूण 197 कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. मात्र ग्रामीण भागातील अनेकांना या संपाची माहिती नसल्याने कामासाठी तालुक्याच्या विविध ठिकाणाहून आलेल्यांची मोठी अडचण झाली. त्यांच्याकडून याबाबत तीव्र संताप व्यक्त होत होता.

जुनी पेन्शन लागू करा या मागणी साठी मोहोळ तालुक्यातील पंचायत समिती व महसूल विभागाच्या अधिपत्या खाली काम करणाऱ्या विविध विभागातील कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे सर्व कार्यालये ओस पडली होती,केवळ रिकाम्या खुर्च्या व टेबलांचे साम्राज्य होते. दरम्यान तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग, संजय गांधी विभाग,दुय्यम निबंधक कार्यालय तर पंचायत समितीतील कृषी, घरकुल, महिला बालकल्याण यासह अन्य विभागातील कर्मचारी संपात सामील झाले आहेत.

दरम्यान खरेदी खते, विविध प्रकारचे दाखले, संजय गांधी विभागातील कामासाठी आलेल्या वृद्ध, महिला यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. त्यांच्या कडुन वेळ व पैसे वाया गेल्याने संताप व्यक्त होत होता.दरम्यान पंचायत समिती कार्यालयाच्या प्रवेश०दारा जवळ बेमुदत संपाचा फलक लावला होता मात्र त्या ठिकाणी कोणीही कर्मचारी नव्हता.

संपात सहभागी झालेले विभाग न्याय कर्मचारी पुढील प्रमाणे -

  • पंचायत समिती - 46

  • तहसील कार्यालय - 68

  • महिला बालकल्याण विभाग - 9

  • दुय्यम निबंधक कार्यालय - 3

  • आरोग्य विभाग - 71

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com