esakal | मोहोळ: वीस विविध कार्यकारी सोसायटयांच्या निवडणुकीचा वाजला बिगुल IElection
sakal

बोलून बातमी शोधा

election

मोहोळ: वीस विविध कार्यकारी सोसायटयांच्या निवडणुकीचा वाजला बिगुल

sakal_logo
By
राजकुमार शहा

मोहोळ(सोलापुर) : कोरोनाचा प्रभाव कमी होताच मोहोळ तालुक्यातील पहिल्या टप्प्यातील व ब वर्गातील विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, सोमवार ता 4 रोजी 20 विकास सोसायट्यांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली. निवडणुक निर्णय अधिकारी यांची नेमणूक होताच निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर होणार असल्याची माहिती मोहोळ येथील सहाय्यक निबंधक व्ही बी माने यांनी दिली.

ग्रामीण भागातील विकास सोसायट्या म्हणजे शेतकऱ्यांचा आर्थिक कणा आहे. गाव पातळीवरील विविध पिकांचे कर्ज रोखे, पाईपलाईन व मोटर साठी या सोसायटया मार्फत शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा केला जातो. या विकास सोसायट्या त्याच्या परिसरातील जिल्हा मध्यवर्ती बँकेची जोडलेल्या असतात.माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शना खाली अनेक विकास सोसायट्यांचा विकासाचा आलेख चढता आहे. अनेक सोसायट्यांच्या बँकेत मुदत ठेवी आहेत. अनेक विकास सोसायट्यांचा वसुल हा शंभर टक्के असल्याने सभासदांना वर्षाकाठी लाभांश देतात. त्यामुळे विकास सोसायट्या म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रगतीचे साधन आहे.

हेही वाचा: Bigg Boss Marathi 3: भावाची बाजू घेतल्यानं आदर्श शिंदे ट्रोल

मात्र सध्या तरी तशी परिस्थिती राहिलेली नाही. शासनाच्या रेट्यामुळे व शेतकऱ्यांच्या मागणीमुळे राष्ट्रीय बँकाही पिक कर्ज देऊ लागल्या आहेत. त्यांना शेतकऱ्यांना कर्ज देण्याबाबत उद्दिष्ट दिले जात आहे. विकास सोसायट्यांच्या निवडणुकीसाठी एकूण 4 हजार 420 सभासद मतदान करणार आहेत. अनेक विकास सोसायट्या बिनविरोध होण्याची शक्यता आहे. दरम्यान ड वर्गातील विकास सोसायट्यांच्या निवडणुकीची ही चाहूल लागली असून, त्यांना मतदार याद्या सादर करण्याचे आदेश दिल्याचे सहाय्यक निबंधक माने यांनी सांगितले. दरम्यान विकास सोसायटयाच्या निवडणूक प्रक्रियेचा अहवाल वरिष्ठांना सादर करताच निवडणूक निर्णय अधिकारी यांची नेमणूक करून अधिकृत कार्यक्रम जाहीर करतात.

निवडणुका लागलेल्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झालेल्या विकास सोसायट्या पुढील प्रमाणे -

शंकरराव बाजीराव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, खंडोबाचीवाडी, मोरवंची, वडवळ, कोळेगाव, मुंडेवाडी, नांदगाव, परमेश्वर-पिंपरी, कुरणवाडी, बिटले, खंडाळी नं. 2 ,येणकी, सावळेश्वर, देगाव, बोपले, वाफळे, गलंदवाडी, उमादेवी पाटील, वडवळ ,राजन पाटील विकास सोसायटी, हिंगणी, बाळराजे कुरुल,सहकार महर्षी शंकराव पाटील या त्या सोसायटया आहेत .

loading image
go to top