MLA Yashwant Mane : मोहोळ विधानसभा मतदारसंघात होणार नवीन 29 तलाठी कार्यालये

मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी विविध गावचे रस्ते, समाज मंदिरे व अन्य विकास कामावर मोहोळ विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला आहे.
mla yashwant mane
mla yashwant maneSakal

मोहोळ - मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी विविध गावचे रस्ते, समाज मंदिरे व अन्य विकास कामावर मोहोळ विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला आहे. त्यांनी आता महसूल विभागाकडे लक्ष केंद्रित केले असून, मोहोळ तालुक्यातील 19 व मतदार संघातील इतर गावासाठी 10 ठिकाणी तलाठी कार्यालय बांधण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे परवानगीसह निधीची मागणी केली असल्याची माहिती त्यांनी दिली.

तलाठी म्हणजे महसूल विभागाचा ग्रामीण भागातील भक्कम पाया आहे. शेतकऱ्याची प्रत्येक गोष्ट तलाठ्यावर अवलंबून आहे. त्यात सातबारा उतारे 8अ चे उतारे तसेच इतर विविध दाखल्यासाठी त्यांच्याकडे जावे लागते. तसेच विविध महसुली प्रकरणे, पीक पाणी नोंदी हे त्यांच्यावरच अवलंबून आहे. अशा तलाठ्यासाठी त्यांना स्वतंत्र कार्यालय नाही. त्यामुळे अडचणी येतात.

सोलापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी रत्नाकर गायकवाड यांच्या कार्यकाळात 47 ठिकाणी तलाठी सजे होते. त्यानंतर त्याचे विस्तारीकरण होऊन 55 झाले. सध्या अनेक तलाठी कार्यालये ही ग्रामपंचायतीच्या, विविध कार्यकारी सोसायटीच्या जागेत आहेत.

तालुक्यात सध्या 28 ठिकाणी ग्रामपंचायत व इतर विभागाच्या शासकीय जागेत कार्यालय सुरू आहेत. मात्र 19 ठिकाणी कार्यालय नाहीत. स्वतंत्र तलाठी कार्यालय झाली तर उपजिल्हाधिकारी तहसीलदार,मंडल निरीक्षक यांच्या सारख्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी येऊन काही अडचणीचे प्रश्न सोडविण्यास मदत होणार आहे.

आमदार माने यांनी महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे तलाठी कार्यालयाच्या बांधकाम व निधीची मागणी करताच कक्ष अधिकाऱ्या कडून सोलापूरच्या जिल्हाधिकार्‍यांना तशा आशियाचे पत्र प्राप्त झाले असून, त्यात वस्तुस्थितीची माहिती व तपासणी करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

मोहोळ तालुक्यातील या गावात तलाठी कार्यालयाची केली आहे मागणी -

सावळेश्वर, पांडवाची पोफळी, खुनेश्वर, आष्टी, चिंचोली काटी, मसले चौधरी, यल्लमवाडी, शेटफळ, देवडी, गोटेवाडी, कामती बुद्रुक, कामती खुर्द, शिंगोली, कोरवली, हिवरे, बोपले, बिटले, खंडोबाची वाडी, कोन्हेरी

पंढरपुर तालुका - फुलचिंचोली, आंबे चिंचोली, सरकोली, ओझेवाडी,

उत्तर सोलापूर तालुका - हगलूर, पडसाळी, कळमण, कौठाळी, रानमसले, दारफळ( गावड़ी)

मोहोळ तालुक्यातील विविध गावात नव्याने तलाठी कार्यालय झाली तर कामात सुसूत्रता येणार आहे तसेच शेतकऱ्यांनाही ते सोयीचे होणार आहे

- बबन अचलारे, अध्यक्ष मोहोळ तालुका तलाठी संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com