Mohol News : मोहोळ विधानसभेचा आमदार शरद पवार गटाचाच; कार्यकर्त्यांनो लागा कामाला - महेश माने

येत्या लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आढावा बैठका सुरू आहेत.
Mahesh Mane
Mahesh Manesakal

मोहोळ - येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागणार आहे. त्यासाठी मोहोळ विधानसभा मतदार संघातील युवकांनी कामाला लागावे, खा शरद पवार यांचे विचार समोर ठेवून काम करा येत्या मोहोळ विधानसभेचा आमदार हा शरद पवार गटाचाच होईल यात शंका नाही असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पक्ष निरीक्षक महेश माने यांनी केले.

येत्या लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आढावा बैठका सुरू आहेत. मोहोळ येथील आढावा बैठकीत पक्ष निरीक्षक माने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत होते. यावेळी काही पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर मोहोळची ही पहिलीच बैठक होती.

यावेळी बोलताना राष्ट्रवादी युवक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत बाबर म्हणाले, खासदार पवार यांच्या अडचणीच्या काळात काहीजण पक्ष सोडून गेले, मात्र गेले ते बरे झाले त्यामुळे युवकांना मनमोकळे काम करण्याची संधी मिळाली. त्यांचा गट आहे, आपली पार्टी आहे.

खासदार पवारांना मानणारा मोठा वर्ग मोहोळ विधानसभा मतदारसंघात आहे, बूथ कमिट्यावर भर द्या स्थानिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य द्या. यावेळी अॅड पवन गायकवाड म्हणाले, सीबीआय व ईडी ला घाबरून अनेक जण पक्षाच्या बाहेर गेले. जनतेला परिवर्तन पाहिजे. खासदार पवारांची राष्ट्रवादी हीच खरी राष्ट्रवादी आहे.

यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस रमेश बारसकर म्हणाले, खासदार पवार यांचे नाव घेतल्या शिवाय माजी आमदाराचे भाषण पूर्ण होत नव्हते. खा पवारांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष पद, साखर कारखाना दिला प्रत्येक ठिकाणी काम करण्याची संधी दिली एवढे असताना खासदार पवारांच्या पाठीत खंजीर खुपसून जातीयवादी भाजपा बरोबर का गेले याचे उत्तर द्यावे.

सन 2024 च्या निवडणूक लढाईत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना होणार आहे. मोहोळ विधानसभेची जागा ही खासदार पवार गटालाच मिळणार आहे. मोहोळ विधानसभा मतदारसंघात खासदार पवार यांना व मानणारा मोठा वर्ग आहे येत्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारालाच आघाडी मिळणार आहे.

त्यानंतरच विधानसभेचे चित्र स्पष्ट होणार आहे. यापूर्वी निवडां आलेल्या आमदारांच्या मतांचा हिशोब केला तर सातत्याने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे सातत्याने दीड घटले आहे. त्यामुळे येत्या विधानसभेचा आमदार शरद पवार गटाचाच होईल यात शंका नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com