Former Mla Ramesh kadam
Former Mla Ramesh kadamsakal

Ramesh Kadam : कार्यकर्त्यांनी संभ्रमात राहू नये; मी मोहोळ विधानसभा निवडणुक लढविणारच

कोणी कितीही अफवा पसरविल्या तरी ही मी मोहोळ विधानसभा मतदार संघातून विधानसभेची निवडणूक लढविणारच, कार्यकर्त्यांनी संभ्रमात राहू नये.

मोहोळ - कोणी कितीही अफवा पसरविल्या तरी ही मी मोहोळ विधानसभा मतदार संघातून विधानसभेची निवडणूक लढविणारच, कार्यकर्त्यांनी संभ्रमात राहू नये, गेल्या काही दिवसा पासून माझ्या वैयक्तिक कामामुळे मी मोहोळला येऊ शकलो नाही. मोहोळ सोडून कुठल्याही विधानसभेचा विचार माझ्या डोक्यात नाही.

लोकसभेच्या अंतिम टप्प्यात आपण आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचे प्रतिपादन मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनी केले. दरम्यान आपण कुठल्याही निर्णय घ्या आम्ही तुमच्या पाठीशी असल्याचा सूर उपस्थीत जनतेतून ऐकावयास मिळाला.

येथील लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार कदम यांच्या कार्यकर्त्यांनी विचार विनिमय व स्नेह मेळावा आयोजित केला होता त्यावेळी ते मार्गदर्शन करीत होते. यावेळी अनेकांनी आपण घ्याल तो निर्णय शिरसावंध्य असल्याचा निर्धार व्यक्त केला.

माजी आमदार कदम पुढे म्हणाले, मी आमदार झाल्यानंतर केवळ आठ महिनेच मला काम करण्याची संधी मिळाली पण मी आठ वर्षांनंतर ही मोहोळ आल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांनी त्याची जाण ठेवली. मोहोळची जनता ही काम करणाऱ्यांवर प्रेम करते हे यापूर्वी त्यांनी दाखवून दिले आहे. गावागावात संपर्क ठेवा, येत्या काळात ही "मागेल त्याला पाणी मागेल त्याला रस्ता" हे काम सुरू करणार असल्याचे ही माजी आमदार कदम यांनी सांगितले.

दरम्यान सध्या शेतकरी मोठ्या अडचणीत आहे, शेतकऱ्यांच्या व्यथा खासदार शरद पवार यांना चांगल्या माहिती आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अडचणीचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण खासदार पवार यांच्या गटातूनच निवडणूक लढवावी असे मनोगत चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रदिप निर्मळ यांनी व्यक्त केले. त्यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांनी त्याला टाळ्याच्या गजरात मोठी साथ दिली.

यावेळी जयपाल पवार, शशीकांत कसबे,आबा कांबळे, कड्याप्पा पवार, रेणुका सोनवणे, धनाजी वाघमारे, स्वाती माने, मुक्ता खंदारे, सुशांत देवकुळे, श्री कांबळे, प्रमोद खंदारे, नामदेव काळे, यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी नागेश खिलारे सुधीर खंदारे, संतोष बिराजदार, सचिन भिसे, धनाजी वाघमारे, चेतन सकट, पप्पू पवार, कृष्णा जाधव, उमेश वाघमारे, पूजा खिलारे, कविता ढोबळे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com