Solapur Crime : लॉजवर तरुणीचा विनयभंग; सोलापुरातील दोघांविरुद्ध गुन्हा

सोशल मीडियावरील मेसेज व व्हिडिओ कॉल कुटुंबीयांना दाखवण्याची धमकी देऊन एकाने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महाविद्यालयीन तरुणीला सोलापुरातील लॉजवर बोलावून तिचा विनयभंग केला.
Solapur Crime
Solapur Crimesakal

सोलापूर : सोशल मीडियावरील मेसेज व व्हिडिओ कॉल कुटुंबीयांना दाखवण्याची धमकी देऊन एकाने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महाविद्यालयीन तरुणीला सोलापुरातील लॉजवर बोलावून तिचा विनयभंग केला. सोमवारी (ता. १२) सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी त्या तरुणासह त्याला मदत केलेल्या अशा दोघांविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सय्यद महमद शेख (वय २१), सोहेल सैफन सुतार ऊर्फ फैजल (दोघे रा. काझी कणबस, ता. अक्कलकोट) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. फिर्यादी ही एका तालुक्याच्या ठिकाणी विज्ञान पदवीचे शिक्षण घेत आहे.

Solapur Crime
Solapur University : उत्तरपत्रिकांची तपासणी ‘सीएचबी’ भरोसे ; ‘शिक्षणशास्त्र, लॉ, फार्मसी’साठी प्राध्यापक कमी,काठावर पासचे प्रमाण लक्षणीय

दोन वर्षांपूर्वी तिची सोशल मीडियातून सय्यद याच्याशी ओळख झाली. त्यानंतर ते फोनवरून एकमेकांशी बोलत होते. तसेच तिच्या महाविद्यालयापासून काही अंतरावरील संस्थेत तो शिकायला असल्याने ते बसमधून एकत्र जायचे. तसेच सोशल मीडियातून एकमेकांना चॅट, व्हिडिओ कॉल करायचे. सहा महिन्यांपूर्वी त्याने तिला संदेश पाठवून तू मला भेटायला ये, अन्यथा तुझे संदेश कुटुंबीयांना दाखवेन, अशी धमकी देऊन तिला तालुक्याच्या ठिकाणांवरील लॉजवर नेले. तेथे तिचा विनयभंग केला. त्यानंतर तिने वारंवार तिचे संदेश व व्हिडिओ कॉल डिलीट करण्याची विनंती केली. मात्र, तो आठ-दहा दिवसांपासून तिला सोलापुरात भेटायला बोलावत होता.

त्यामुळे तिने सोलापूर गाठले. सोमवारी सकाळी बसस्थानकात पोहोचल्यावर तिने त्याला कॉल केल्यावर त्याने तिला आणण्यासाठी मित्र फैजल याला पाठवले. त्याने तिला दुचाकीवर बसवून एका लॉजवर नेले. तिला सोडून तो निघून गेला. त्यानंतर सय्यद याने तिचा विनयभंग केला. पुन्हा भेटायला न आल्यास ते तिच्या कुटुंबीयांना दाखवण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडितेने पोलिस ठाणे गाठले. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक विष्णू गायकवाड तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com