

Delay in Monsoon Arrival Worries Farmers; Solapur Awaits Rainfall
sakal
सोलापूर : नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) यंदाचे आगमन १६ मे रोजी अंदमान आणि निकोबार बेटांवर झाले होते. श्रीलंकेच्या आसपास मॉन्सूनचे वारे खोळंबले आहेत. मॉन्सून का खोळंबला आहे, याबद्दल हवामान विभागही स्पष्टता देत नाही. सोलापूर व परिसरात मॉन्सून दाखल होण्यासाठी ११ जूनपर्यंत वाट पहावी लागण्याची शक्यता हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केली आहे.