MLA Yashwant Mane : मोहोळ विधानसभा मतदार संघातील विकास कामावरील स्थगिती उठवली

मोहोळ विधानसभा मतदार संघातील 36 कोटी 58 लाख रुपयाच्या मंजूर विकास कामांची स्थगिती हटविण्यात आल्याची माहिती मोहोळचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार यशवंत माने यांनी दिली.
yashwant mane
yashwant manesakal

मोहोळ - मोहोळ विधानसभा मतदार संघातील 36 कोटी 58 लाख रुपयाच्या मंजूर विकास कामांची स्थगिती हटविण्यात आल्याची माहिती मोहोळचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार यशवंत माने यांनी दिली, त्यामुळे मतदार संघातील रखडलेल्या रस्त्यांची व जलसंधारणाची कामे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, गेल्या सुमारे पाच वर्षापासून मोहोळ विधानसभा मतदार संघातील विविध रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. या बाबत गावोगावच्या नागरिकांनी आमदार माने यांच्याकडे रस्त्याची मागणी केली होती, तसेच ते दुरुस्तीचे ही प्रस्ताव दिले होते.

मात्र तत्कालीन शिंदे- फडणवीस सरकारने मंजूर असलेल्या विकास कामास स्थगिती दिली होती. त्यामुळे रस्त्याची व जलसंधारणाची कामे रखडली होती.

दरम्यान रखडलेल्या विकास कामावरील स्थगिती उठविण्यासाठी आमदार माने यांनी पाठपुरावा सुरूच ठेवला होता. या स्थगितीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 12 कोटी 11 लाख व जलसंधारणाच्या 24 कोटी 47 लाख रुपयांच्या कामांचा समावेश आहे.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सकारात्मकते मुळे वरील मंजूर असलेल्या कामांना दिलेली स्थगीती उठविण्यात आली, त्यामुळे ती कामे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com