पुरुषांपेक्षा महिलांची कोरोनाशी यशस्वी फाईट! ८६ हजार ७२७ महिलांची कोरोनावर मात

हसता- खेळता परिवार कोरोनाने दु:खाच्या खाईत लोटला गेला. पत्नीचा आधार, चिमुकल्यांचे बाबा, वयस्क माता-पित्यांचा वारस कोरोनाचा बळी ठरला. पण, कोरोनाच्या तिन्ही लाटांमध्ये जिल्ह्यातील पुरुषांपेक्षा महिला बाधितांची संख्या कमी राहिली आणि कोरोनावर मात करण्यात महिलाच सर्वाधिक यशस्वी ठरल्या.
31Corona_20akola_2001_1_3.jpg
31Corona_20akola_2001_1_3.jpgesakal
Updated on

सोलापूर : मार्च २०२० मध्ये राज्यात कोरोनाचा शिरकाव झाला अन्‌ संपूर्ण महाराष्ट्राची चिंता वाढली. हसता- खेळता परिवार कोरोनाने दु:खाच्या खाईत लोटला गेला. पत्नीचा आधार, चिमुकल्यांचे बाबा, वयस्क माता-पित्यांचा वारस कोरोनाचा बळी ठरला. पण, कोरोनाच्या तिन्ही लाटांमध्ये जिल्ह्यातील पुरुषांपेक्षा महिला बाधितांची संख्या कमी राहिली आणि कोरोनावर मात करण्यात महिलाच सर्वाधिक यशस्वी ठरल्या.

31Corona_20akola_2001_1_3.jpg
८५ टक्के रुग्णांमध्ये लक्षणे नाहीत! लसीकरणामुळे मृत्यूदर घटला; ७.२५ कोटी व्यक्ती सुरक्षित

जिल्ह्यातील दोन लाख १९ हजार ७४३ जणांना आतापर्यंत कोरोनाची बाधा झाली. त्यातील पाच हजार २३१ जणांचा कोरोनाने बळी घेतला आणि अनेकजणांचे होत्याचे नव्हते झाले. पंढरपूर, बार्शी, माळशिरस व माढा या चार तालुक्यांसह सोलापूर शहराच्या मृत्युदराने जिल्ह्याचीच नव्हे तर राज्याची चिंता वाढविली होती. जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या तुलनेत त्या चार तालुक्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण व मृत्यू सर्वाधिक झाले. आता कोरोना पुन्हा वाढतोय, पण सोलापूर शहर- जिल्ह्यात अजून कोरोना वाढलेला नाही. तरीदेखील दोन महिन्यांपासून कमी झालेली रुग्णसंख्या आता वाढत आहे. बार्शी शहरात दोन, मोहोळ शहरात एक रुग्ण असून मंगळवेढा, दक्षिण सोलापूर व मोहोळ तालुक्यातील प्रत्येकी एका गावात रुग्ण आढळला आहे. शहरातही कोरोनाचा एक रुग्ण असून जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या आता सात झाली आहे. ज्या कोरोनाने कुंटुंब उद्‌ध्वस्त केले, त्यापासून सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येकाने प्रतिबंधित लस आणि मास्क वापरावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. कामानिमित्त घराबाहेर जाणाऱ्यांनी आपल्यामुळे कुटुंबातील वयस्क किंवा लहान मुलांना कोरोनाची बाधा होणार नाही, याची दक्षता सर्वांनीच घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

31Corona_20akola_2001_1_3.jpg
दारू गाळणाऱ्या हातांनी बनविला ‘बंजारा’ ब्रॅण्ड! हातभट्टी दारूमुक्तीकडे सोलापूरची वाटचाल

कोरोना वाढूनही टेस्टिंग वाढलेच नाही
राज्यातील मुंबईसह पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी टेस्टिंग आणि लसीकरणावर भर देण्याच्या सक्त सूचना आरोग्य कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. मात्र, सोलापूर शहर-ग्रामीणमध्ये अजूनही ना टेस्टिंग ना लसीकरणात वाढ झाली. मंगळवारी (ता. ७) शहरातील ८८ तर ग्रामीणमधील केवळ ६३ जणांचीच टेस्ट केल्याचे अहवालातून स्पष्ट होते. त्यामुळे या निष्काळजीपणाचा भविष्यात मोठा फटका बसू शकतो.

31Corona_20akola_2001_1_3.jpg
ठाकरे सरकार घेणार मोठा निर्णय! १० गुंठ्यांपर्यंत जमीन खरेदी-विक्रीला परवानगी

कोरोनाची आतापर्यंतची स्थिती
एकूण बाधित पुरुष

१,३१,१६३
कोरोनामुक्त पुरुष
१,२७,७७८
कोरोनाबाधित महिला
८८,५८०
कोरोनामुक्त महिला
८६,७२७
कोरोनामुळे पुरुषांचा मृत्यू
३,३८०
कोरोनामुळे दगावलेल्या महिला
१,८५१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Emergency Rural Safety System Suspended in Solapur Over Lack of Funds
 Inspector of Police
MLA Dr. Babasaheb Deshmukh
Congress spokesperson Hanumant Pawar criticizes BJP over Ram Mandir credit politics and 'Ladki Bahin' scheme policy
Marathi News Esakal
www.esakal.com