

Barshi Horror: Police Register Murder Case Against Mother Following Infant's Death
sakal
बार्शी : जन्मदात्या आईनेच अवघ्या १० महिन्यांच्या चिमुकलीचा गळा दाबून खून करुन तिला पाण्याच्या बादलीत बुडविले. त्यानंतर तिने सहा वर्षांच्या मुलीलाही जीवे मारण्याचा प्रयत्न केला. कळस म्हणजे ही जन्मदाती मृत मुलीला खांद्यावर घेऊन शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली. ही घटना रविवारी (ता. १९) सकाळी नऊ ते दहाच्या सुमारास बार्शीत घडली. या हृदयद्रावक घटनेमुळे बार्शी शहरात हळहळ व्यक्त होत आहे.