Mothers Day Special : रुग्णसेवेसाठी कष्ट करणारी आई 196 दिवसांनी भेटली

Mothers Day Special : रुग्णसेवेसाठी कष्ट करणारी आई 196 दिवसांनी भेटली
Summary

कोरोनात झालेली आमची ताटातूट आयुष्यभर स्मरणात राहील अशी भावना सिव्हिलच्या नर्स सीमा डोके यांची कन्या सारंगीने व्यक्त केली आहे.

माझी आई छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील कोव्हिड वॉर्ड सांभाळते. गेल्या वर्षापासून आई व बाबा कोरोना रुग्णांची अविरत सेवा करत आहेत. आम्हाला कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून आई बाबांनी मला व माझ्या भावाला आजीकडे आणून सोडले. कोरोनात झालेली आमची ताटातूट आयुष्यभर स्मरणात राहील अशी भावना सिव्हिलच्या नर्स सीमा डोके यांची कन्या सारंगीने व्यक्त केली आहे. (Mothers day special sarangi, daughter of nurse seema doke, shared some memories of her mother)

इयत्ता 6 वी मध्ये शिकणाऱ्या सारंगीने आपल्याला आईचचा मला अभिमान असल्याचीही भावना व्यक्त केली. सारंगी म्हणाली, कोरोनाचा परिणाम सर्वांच्याच आयुष्यात कोणत्या ना कोणत्या प्रकारे झाला आहे. माझ्याही आयुष्यावर याचा परिणाम झालाय. ही साथ पसरायला लागली तेव्हा माझी चौथीची परीक्षा सुरू होती. माझ्या मैत्रीणीसारखेच मी व माझा लहान भाऊ आदित्य देखील सुट्टीसाठी उत्सुक होतो. उन्हाळ्याच्या सुटीत रोज काय-काय करायचं, हे देखील मी ठरवून टाककलं होतं. तेवढ्यातच देशभरात 14 एप्रिलपर्यंतचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. आम्ही या निर्णयाने फारसा खुश नव्हतो. या रोगाचं गांभीर्य तोपर्यंत मला समजलं नव्हतं.

Mothers Day Special : रुग्णसेवेसाठी कष्ट करणारी आई 196 दिवसांनी भेटली
Mothers Day Special : हत्तीचं बळ देणारी ती आई माझं दैवतच !

माझे बाबा आणि आई हॉस्पिटलमध्ये नर्स आहेत. दोघेही क्षेत्रं 'अत्यावश्‍यक सेवां'मध्ये येतात. म्हणजेच त्या दोघांचंही काम लॉकडाऊनच्या काळात सुरू राहणार होतं. त्यातच, माझ्या आईचा तिच्या हॉस्पिटलमधल्या कोरोना पेशंट्‌सची काळजी घेणाऱ्या टीममध्ये समावेश करण्यात आला होता. माझ्या नर्स आईला आणि मग तिच्यामुळे मला इन्फेक्‍शन होईल, अशी भीती सर्वांना वाटत होती, त्यामुळे काळजीपोटी मग आम्हाला आजीकडे आजोळी सोडण्यात आले. आई-बाबा या काळात मला कधीकधी आजीकडे भेटायला आले नाहीत. आईला कोविड ड्युटी लागली होती. कोविड-ड्युटीच्या कालावधीनंतर तिला तिच्या हॉस्पिटलजवळच्याच हॉस्टेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं. बाबासुद्धा कोविड ड्युटीला जाऊ लागले. जवळपास महिनाभर बाबांनी तिला पाहिलंही नव्हतं.

आम्हीतर दुरगावी होतो. फक्त फोनवर बोलणं व्हायचं. त्या दिवसांमध्ये आमच्या चौघांच्या कुटुंबात बाबा घरी एकटे, मी व भाऊ आजी-आजोबांकडे आणि आई एकटी हॉस्टेलवर क्वारंटाईनध्ये असायची. आम्ही आईला धीर द्यायचो. स्वत:ची काळजी घेऊन रुग्णसेवा मनापासुन कर, असे सांगीतलं. आम्ही त्यांना आजोळी येण्यास विरोध करत होतो. कारण, त्यांना पोलिसांनी पकडले असते अथवा कोरोनाची लागण होईल अशी भिती वाटे. यादरम्यान, आम्हाला आमच्या आजी-आजोबा, मामा-मामी, मावशी यासर्वांनी खुप लाड केले. मला खरंतर तिला जाऊन द्यायचंच नव्हतं. पण तिला जावंच लागलं, कारण सध्या हॉस्पिटलमध्ये नर्सेसचा तुटवडा आहे. इतक्‍या जबाबदारीने वागणाऱ्या पालकांचा मुलगी असल्याचा मला अभिमान आहे. अखेर 216 दिवसानंतर आम्हाला आईने घरी आणले. कारण आता कोरोनासोबत जगायचे आहे, असे ठरवले आहे. सध्या आपल्याला घरी बसून कंटाळा येतोय, आपले हक्क हिरावल्यासारखं वाटतंय. पण कोरोनाची साखळी मोडून काढण्यासाठी ते गरजेचं आहे.

Mothers Day Special : रुग्णसेवेसाठी कष्ट करणारी आई 196 दिवसांनी भेटली
Mothers Day Special : स्वयंप्रेरणेतून आईने केले 35 वेळा रक्तदान

एकदा आईची खबरदारीचा उपाय म्हणून तिची कोरोनासाठीची चाचणी घेण्यात आली. आम्हा सगळ्यांनाच त्यांचं टेन्शन आलं होतं. त्यात तिच्या एका सहकाऱ्याची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचं समजल्याने कुटुंबातल्या सगळ्यांचीच काळजी वाढली होती. आईला आम्ही रोज फोन करायचो. कधी-कधी व्हिडिओ कॉल. तिला वाईट वाटतंय, एकटं वाटतंय हे समजायचं मला. मी आणि कुटुंबातले सगळेच तिला चीअर-अप करण्याचा प्रयत्न करायचो. तिला हसवण्यासाठी मी काहीतरी जोक करायचे. पण ती खूप मोठ्या धोक्‍याला रोज सामोरी जात असल्याची जाणीव मनात खोलवर कुठेतरी होतीच.

- सारंगी डोके, नर्सची मुलगी

- कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्याचे समजताच सगळ्यांनीच सोडला निःश्वास

- सण, वाढदिवसाला जाणवली आई-बाबांची कमतरता

- तब्बल 196 व्या दिवशी आई-बाबा अचानक आजोळी आले

- आईला ला घट्ट मिठी मारावी वाटत होती पण तिने आम्हाला तिच्यापासून लांब ठेवले

- आईची भेट 2020 मधला माझ्यासाठीचा आतापर्यंतचा हा सगळ्यात चांगला दिवस

कोरोनाचे संकट गंभीर आहे. प्रत्येकाने स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. कोरोनाच्या संकटातून सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे व कोरोनाच्या लढाईत आपले योगदान द्यावे.

- सीमा डोके, नर्स, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर

(Mothers day special sarangi, daughter of nurse seema doke, shared some memories of her mother)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com